बिच्चारे गरीब अन् बेघर सभासदच ‘लक्षाधीश’

By Admin | Published: March 26, 2015 12:23 AM2015-03-26T00:23:53+5:302015-03-26T00:27:42+5:30

‘आदिनाथ’च्या नोंदणीत फसवेगिरी : उपनिबंधकांवर कारवाई होणार का..

The poor and the unemployed members are 'millionaire' | बिच्चारे गरीब अन् बेघर सभासदच ‘लक्षाधीश’

बिच्चारे गरीब अन् बेघर सभासदच ‘लक्षाधीश’

googlenewsNext

कोल्हापूर : गरीब आणि बेघर असलेल्या सभासदांसाठी आदिनाथ को-आॅप. हौसिंग सोसायटी स्थापन केल्याचे नोंदणी कागदपत्रात म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात सभासदांच्या उत्पन्नाचे दाखले पाहता ते लक्षाधीश असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी कारवाईच्या आदेशात म्हटले. जागा बळकावताना कशा प्रकारे खोटी कागदपत्रे तयार केली जातात, त्याला सरकारी अधिकारीही बिनबोभाट कशी मंजुरी देतात व सरकार, राजकीय पुढारी-बिल्डर यांची साखळी कशी काम करते, याचा उत्तम नमुनाच या व्यवहारामध्ये अनुभवास येतो.
दराडे यांनी असे निरीक्षण नोंदविले आहे की, या संस्थेस रि. स. नं. ५०८/१, ५०९/१ व ५१२ पैकी कसबा करवीर येथील अतिरिक्त ठरलेली ११ हजार ८६० (१ लाख २७ हजार ६१३ चौरस फूट) जागा शासनाने मंजूर केली; परंतु मूळ संस्थेची नोंदणी कागदपत्रांची छाननी न केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मुख्य प्रवर्तक रंजना हंजीकर यांनी २८ जुलै २००६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यामध्ये सभासदांना भूखंड मागणी करताना सभासद संख्या ९० दाखविली व प्रत्यक्षात संस्था नोंदणी करताना १७ नोव्हेंबर २००६ रोजी प्रवर्तक सभासदांची संख्या १२३ दिली. सचिन ओसवाल या सदस्याने सही मात्र कल्पेश ओसवाल अशी केली. सभासद गरीब असून बेघर असल्याचे म्हटले; प्रतिज्ञापत्रात ते लक्षाधीश असल्याचे म्हटले. घरे बांधण्यासाठीच जागा मंजूर असताना फ्लॅट बांधून विक्री सुरू होती. किरण पाटील हे सभासद नसतानाही त्यांच्याकडून लाख रुपये घेतले आहेत. तक्रारदारातर्फे अ‍ॅड. राहुल देसाई व राजेश सुतार यांनी युक्तिवाद केला.


एकाच कुटुंबातील
मुख्य प्रवर्तक हर्षल राठोड व त्यांची पत्नी दोघेही सभासद आहेत; परंतु प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपण एकाच कुटुंबातील नसल्याचे लिहून दिले आहे. एकूण १२३ पैकी ५८ सभासद एकाच कुटुंबातील आहेत.



रामसिना गु्रपमध्ये नोकरीस असताना २००८ मध्ये या संस्थेमध्ये सभासद करून घेत असल्याचे सांगून काही कागदपत्रावर सह्या व फोटो ओळखपत्र करून घेतले. त्यांना सभासद करून घेतल्याचे सांगून संचालकपदी नाव घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसत असल्याचे म्हटले आहे. संस्थेची नोंदणी प्रक्रिया कायदेशीर असून सभासद कोण असावे याबाबत शासनाचे कोणतेही निर्बंंध नाहीत. त्यामुळे नोंदणी रद्द करू नये असे म्हणणे सचिन ओसवाल यांच्यावतीने अ‍ॅड व्ही. एन. घाटगे यांनी मांडले. संस्थेतर्फे अ‍ॅड. वाघ यांनी बाजू मांडली.



दराडे यांचे ‘धाडस’
आदिनाथ सोसायटीमध्ये बड्या राजकीय धेंडांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने या संस्थेवर कारवाई होणार का, अशी शंका सर्वसामान्य लोकांत होती; परंतु विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी सगळा दबाव झुगारून ही कारवाई केली आहे.

सलगर व हंजीकर
बेघर लोकांना शासनाकडून जमीन मिळते असे सांगून सौ. हंजीकर व सुनील सलगर यांनी सभासद करून घेतल्याची तक्रार सुरेश काकडे यांनी केली. ते नोंदणीवेळी सभासद होते; परंतु त्यांचे नाव उडवून त्या ठिकाणी हर्षल राठोड यांचे नाव समाविष्ट केले.

Web Title: The poor and the unemployed members are 'millionaire'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.