बाहुबलीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:22 AM2021-01-18T04:22:39+5:302021-01-18T04:22:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हातकणंगले तालुक्यातील नेज, शिवपुरी, बाहुबली, कुंभोज, नरंदे आदी गावांना जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या ...

Poor condition of roads connecting Bahubali | बाहुबलीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

बाहुबलीला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

हातकणंगले तालुक्यातील नेज, शिवपुरी, बाहुबली, कुंभोज, नरंदे आदी गावांना जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या शिवपुरी ते बाहुबली या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. त्याचबरोबर वडगावकडून बाहुबलीला येणाऱ्या रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे.

बाहुबली- नेज- शिवपुरी रस्ता व वडगावकडून येणारा रस्ता असे दोन मार्ग बाहुबली आहेत; पण रस्त्यावरील खड्डे पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. यामुळे रोज प्रवास करणारे हजारो वाहनधारक व बाहुबलीला दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी आहे.

या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. शिवाय बाहुबली हे जैन बांधवांचे दक्षिण भारतातील मुख्य तीर्थक्षेत्र असल्याने संपूर्ण भारतातून भाविक रात्री- अपरात्री येत असतात. तर जहाज मंदिराकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे.

नेज, शिवपुरी, कुंभोज, नरंदे, बाहुबली, हिंगणगाव दानोळी या गावांतून शेकडो नोकरदार याच रस्त्याने रोज प्रवास करत असतात. या भागात लक्ष्मी इंडस्ट्री, पार्वती इंडस्ट्री, इचलकरंजी येथील सूत गिरण्यांमध्ये नोकरी करणाऱ्या नोकरदारांना शिप्टनुसार वेळी- अवेळी खड्ड्यातून वाट काढावी लागते.

याच वाटेवर विविध प्रकारचे कारखाने असल्याने अवजड वाहनेदेखील या रस्त्यावर सतत धावत असतात. गेल्या कित्येक वर्षांत या रस्त्यावर केवळ पॅचवर्कच करण्यात आले आहे. लवकरात लवकर हा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट

आ. राजू आवळे यांच्याकडून अपेक्षा

या रस्त्यावर सतत छोटे अपघात होत असतात. शिवाय खड्ड्यांमधून प्रवास केल्याने अनेक नागरिकांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक आ. राजू आवळे यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहेत.

फोटो

हातकणंगलेपासून काही अंतरावर असलेल्या शिवपुरी फाट्यापासून ते बाहुबलीदरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मुख्य रस्ताची पाणंद रस्त्यासारखी स्थिती झाली आहे.

Web Title: Poor condition of roads connecting Bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.