बंद पाळून मुरगूडकरांची अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:43 PM2019-01-06T23:43:45+5:302019-01-06T23:43:50+5:30

मुरगूड : तवंदी घाटात झालेल्या भीषण अपघातात मुरगूड (ता. कागल) येथील जमादार कुटुंबीयातील सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ...

Poor homage | बंद पाळून मुरगूडकरांची अपघातातील मृतांना श्रद्धांजली

बंद पाळून मुरगूडकरांची अपघातातील मृतांना श्रद्धांजली

Next

मुरगूड : तवंदी घाटात झालेल्या भीषण अपघातात मुरगूड (ता. कागल) येथील जमादार कुटुंबीयातील सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघं मुरगूड सुन्न झालं होतं. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी शहरातील
सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. सहा मृतदेहांवर पहाटे येथील मुस्लिम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
मुरगूड येथील दिलावर खान बापूसो जमादार, रेहाना दिलावर जमादार, डॉ. मोहसीन दिलावर जमादार, जुनैदखान दिलावर जमादार, आफ्रिन मोहसीन जमादार व आयान मोहसीन जमादार हे सहाजण आपल्या कारने बेळगाव-सांबरा जात असताना तवंदी घाटात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि काळाने या सहाजणांवर झडप घातली.
निपाणी येथील गांधी रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून तेथेच मुस्लिम जन्नत समाजातील लोकांनी धार्मिक विधी आटोपून पहाटे दीडच्या सुमारास ते मुरगूडला आणण्यात आले. सहाही मृतदेह आल्यानंतर जमादार कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळजाला भिडणारा होता. अत्यंत धीर, गंभीर वातावरणात पहाटे दोनच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या नजीक असणाऱ्या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला.
शनिवारीच येथील व्यापारी असोसिएशनने रविवारी मुरगूड बंदची हाक दिली होती. याला सर्वांनी पूर्ण प्रतिसाद दिल्याने शहरातील
एकही दुकान उघडले गेले नाही. डॉक्टर व मेडिकल संघटनाही
बंदमध्ये सहभागी झाल्याने सर्वच दवाखाने आणि औषध दुकाने बंद राहिली.
अनेकांना कोसळले रडू; शोकसभेला प्रचंड गर्दी
मुरगूड शहराच्या भरभराटीसाठी दिलावर जमादार आणि त्यांचे कुटुंबीय यांचे योगदान मोठे होते. खेळ आणि आरोग्य क्षेत्रासाठी दिलावर आणि त्यांचा मुलगा डॉ. मोहसीन यांनी चांगले प्रयत्न केले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची घटना म्हणजे मुरगूड शहरासाठी काळाकुट्ट दिवस आहे. कायमपणे या कुटुंबीयांच्या स्मृती मुरगूडमध्ये जपण्याचा संकल्प नागरिकांनी शोकसभेत केला. तवंदी घाटात झालेल्या भीषण अपघातात मुरगूडमधील दिलावर जमादार यांच्यासह त्यांच्या पत्नी, दोन मुले, सून व नातू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुरगूड शहर पत्रकार फौंडेशन व मुरगूड शहर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने शोकसभा आयोजित केली होती. या शोकसभेला शहरवासीयांची प्रचंड गर्दी केली होती.

Web Title: Poor homage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.