पोपटराव पवार यांची जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कार्यालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 04:44 PM2019-12-17T16:44:28+5:302019-12-17T16:45:30+5:30
जगभरातले शास्त्रज्ञ २०५० सालापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका व्यक्त करत आहेत. तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन हिरवेगारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
कोल्हापूर : जगभरातले शास्त्रज्ञ २०५० सालापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका व्यक्त करत आहेत. तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन हिरवेगारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
पर्यावरण पूरक उपक्रमांनी हिवरेबाजार या गावाचा कायापालट करणारे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी आज ‘आनंदवन’ या इको फ्रेंडली होम येथे असलेल्या जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कार्यालयाला भेट दिली असता आपली भावना व्यक्त केली.
आनंदवन येथे असलेल्या कचरा व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर, फळझाडे लागवड, टेरेसवरील भाजीपाला लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी पर्यावरण उपक्रम यांची पाहणी केली. तसेच जनस्वास्थ्य दक्षता समितीचे व्यसनविरोधी अभियान व अन्य आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयीं चालू असलेल्या चळवळींची माहिती करून घेतली.
दीपक देवलापूरकर यांनी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कामाची माहिती दिली. बृहस्पति शिंदे यांनी प्रास्ताविक केले. हरिप्रिया शिरसीकरने आभार मानले. विष्वश्री पाटीलने सूत्रसंचालन केले. यावेळी प्रभाकर मायदेव, आर. वाय. पाटील, निहाल शिपूरकर, अलका देवलापूरकर, मनिषा शिंदे, वैशाली पुणदीकर लतीफ शेख सह जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.