परिस्थिती सुधारेपर्यंत पॉपलीन कारखाने बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:22+5:302021-06-24T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील पॉपलीन कारखानदारांचे कापड उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकले जात आहे. तसेच दररोज सुताचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील पॉपलीन कारखानदारांचे कापड उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकले जात आहे. तसेच दररोज सुताचे वाढते दर व कापडाला कमी मागणी असल्यामुळे शुक्रवार (दि. २५) पासून पॉपलीन कापडाची परिस्थिती सुधारेपर्यंत शहरातील पॉपलीन उत्पादन करणारे यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
यामुळे शहरातील ८ ते १० हजार यंत्रमागावरील दररोज अंदाजे १५ लाख मीटर कापडाचे उत्पादन ठप्प होणार असून महिन्याला १०० कोटींचा फटका बसणार आहे. यावेळी इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव व विटा येथील यंत्रमाग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सर्व यंत्रमाग केंद्रामध्ये समन्वय ठेवण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे ठरले. बैठकीस कैश बागवान, दिलीप ढोकळे, श्रीशैल कित्तुरे, सुनील पाटील, तुकाराम सावंत, चंद्रकांत पाटील, प्रमोद महाजन यांच्यासह यंत्रमाग कारखानदार उपस्थित होते.