बेडकिहाळ येथील लोकप्रिय उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:21 PM2024-08-10T22:21:21+5:302024-08-10T22:21:38+5:30

मानाच्या हत्तीच्या निधनाने परिसरात हळहळ, अश्रू अनावर झाले.

Popular Usharani elephant in Bedkihal passes away; A deluge of crowds for the funeral | बेडकिहाळ येथील लोकप्रिय उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

बेडकिहाळ येथील लोकप्रिय उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

निपाणी - तालुक्यातील बेडकिहाळ येथील  पाटील मळ्यात  उषाराणी हा मनाचा  हत्ती गेल्या अनेक वर्षा पासून वास्तव्यास होता. जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी  कुप्पानवाडी ट्रस्टचा हा   उषाराणी हत्ती  वय 52 , या हत्तीचे आज  शनिवार तारीख 10 ऑगस्ट रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले. आचार्यरत्न  देशभुषण महाराज यांनी कोथळी कुप्पानवाडी ट्रस्ट साठी त्या वेळी हत्तीचे पिल्लू आणले होते. बेडकिहाळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनविण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे,त्यामुळे  बेडकिहाळ व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष  लळा लागला होता. 

उषाराणीच्या निधनाची बातमी कळताच बेडकिहाळ, शमनेवाडी, चाँदशिरदवाड, बोरगाव  व कोथळी कुप्पानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला उषाराणीचे अंत्य दर्शन घेण्यासाठी गर्दी केले होते. तर या वेळी बऱ्याचजनाना अश्रु अनावर झाले. या वेळी नांदणी  मठाचे प . पू. जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महा स्वामीजी  उपस्थित राहून  श्रद्धांजली वाहिले, त्याच बरोबर  उपस्थितानी उषाराणी च्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. माहूत बासू  लक्ष्मीश्वर हे करत होते. उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली होती,तर बेडकिहाळ चे ग्राम दैवत श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातून होत असलेल्या तिन्ही पालखी सोहळ्यात  सहभागी होऊन पालकिस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे.

उषाराणी हत्तीने शेकडो पंचकल्याण महा पूजे सह, बऱ्याच धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात सहभागी होती, तर जाणता राजा महानाट्य मालिका , व अनेक सिनेमा या  हत्तीने काम केले आहे . आज सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने खुल्या ट्रक मध्ये  मृत देह ठेऊन वाद्यांच्या गजरात गावांतून उषाराणीची मिरवणूक काढण्यात आली, व कोथळी येथे विधिवत्त पणे अंत्य संस्कार करण्यात आले. हत्तीच्या निधनाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते,यावेळी  चीक्कोडी निपाणी तालुक्यातील  जैन धर्मीयां सह इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Popular Usharani elephant in Bedkihal passes away; A deluge of crowds for the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.