अश्लील आॅडीओ क्लिप प्रकरण : विहिंप,बजरंग दलाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:54 PM2019-01-18T15:54:12+5:302019-01-18T16:07:41+5:30
कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये सहभागी असणाºया अन्य संशयितांना आरोपी करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह परिसरातील युवकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर शुक्रवारी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना देण्यात आले.
इचलकरंजी : कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये सहभागी असणाऱ्या अन्य संशयितांना आरोपी करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह परिसरातील युवकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर शुक्रवारी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना देण्यात आले.
कबनूर-दत्तनगर परिसरातील एका अल्पवयीन तरुणीची अश्लील आॅडिओ क्लिप प्रसारीत करून तिला मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह दोन मुख्य संशयित अशा सहाजणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित तरुणाने तिच्याशी फोनवरून अश्लील संभाषण करून ती ध्वनिफित सोशल मीडियावर प्रसारीत केली. अटक केलेल्या संशयित आरोपींनी यापूर्वीही अशी कृत्ये केलेली आहेत.
या प्रकरणात सुरूवातीला संबंधित तरुणाला कबनूर पोलिस चौकीत बोलावून घेवून वडिलांसमक्ष समज दिली होती. या प्रकाराबाबत त्यांच्या नातेवाइकांना माहिती होती. तरीही त्यांनी मुलांना रोखण्याऐवजी फूस लावल्याची तक्रारही आंदोलकांनी केली.
या सर्व प्रकरणांचा गांभीर्याने तपास करून पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवकुमार व्यास, संतोष कोळी उर्फ बाळ महाराज, संतोष हत्तीकर, सोमेश्वर वाघमोडे, सुजित कांबळे, सर्जेराव कुंभार, आदींसह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कबनूर (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. (छाया-उत्तम पाटील)