अंबाबाई मंदिर सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा : महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 02:48 PM2020-08-27T14:48:31+5:302020-08-27T14:49:54+5:30
कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे.
कोल्हापूर : कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे.
कोरोनामुळे केंद्र शासनाने मंदिरे भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केंद्राने मंदिर सुरू करण्याचे जाहीर केले; मात्र अंतिम निर्णय राज्य शासनाने घ्यावा असेही जाहीर केले.
महाराष्ट्र शासनाने मात्र मंदिरे बंद करण्याचाच निर्णय कायम ठेवला. आता मात्र राज्यातील सर्व आस्थापना, मॉल सुरू झाले आहेत. त्यामुळे मंदिरेदेखील सुरू करावीत अशी भक्तांची मागणी आहे.
याचा विचार करून राज्य शासनाने अटी व नियम घालून मंदिरे खुली करण्याची परवानगी द्यावी. समिती मास्क, थर्मल स्कॅन, सॅनिटायझर यासह एकाच वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेईल, असे महेश जाधव म्हणाले.