शिरोलीत अँटिजन चाचणीत एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:02+5:302021-06-22T04:18:02+5:30
शिरोली : शिरोली ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व तलाठी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये ४५१ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी ...
शिरोली : शिरोली ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व तलाठी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये ४५१ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यात एकजण पॉझिटिव्ह आढळला असून, शिरोलीची कोरोनाची साखळी तुटण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शिरोलीत रविवारी, आणि सोमवारी अशी दोन दिवस रॅपिड अँटिजन चाचणी केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणारे नागरिक, मास्क न वापरणारे, व्यापारी, परगावचे भाजीपाला विक्रेते अशा ४५१ जणांची चाचणी करण्यात आली. यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, सरदार मुल्ला, प्रकाश कौंदाडे, तलाठी नीलेश चौगुले, बाजीराव सातपुते, संदीप कांबळे उपस्थित होते.
फोटो : २१ शिरोली चाचणी
शिरोली येथे रॅपिड अँटिजन टेस्ट करताना वैद्यकीय पथक, शेजारी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव.