सकारात्मक कार्यशैली हेच एस. आर. माने यांच्या कारकीर्दीचे गमक: कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 03:41 PM2019-05-02T15:41:31+5:302019-05-02T15:43:50+5:30

शासनाच्या कल्याणकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने यांनी नेहमीच सकारात्मक योगदान दिले आहे. सकारात्मक कार्यशैली व उदंड जनसंपर्क हेच त्यांच्या यशस्वी कारकीदीर्चे गमक आहे, असे गौरवोद्गार महानगरपालिकेचे आयुक्त मलिन्नाथ कलशेट्टी यांनी यांनी येथे काढले.

Positive work style is R. Mane's career gambling: Kalshetty | सकारात्मक कार्यशैली हेच एस. आर. माने यांच्या कारकीर्दीचे गमक: कलशेट्टी

 कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वर्षा पाटोळे, संजय शिंदे, मोहन राठोड, मिलिंद बांदिवडेकर, रत्नाकर पंडीत आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसकारात्मक कार्यशैली हेच एस.आर.माने यांच्या कारकीर्दीचे गमक: कलशेट्टीसेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रम

कोल्हापूर : शासनाच्या कल्याणकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने यांनी नेहमीच सकारात्मक योगदान दिले आहे. सकारात्मक कार्यशैली व उदंड जनसंपर्क हेच त्यांच्या यशस्वी कारकीदीर्चे गमक आहे, असे गौरवोद्गार महानगरपालिकेचे आयुक्त मलिन्नाथ कलशेट्टी यांनी यांनी येथे काढले.

कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने व विभागीय माहिती कार्यालयाचे कर्मचारी सुर्यकांत टोणपे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख उपस्थिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माहिती उपसंचालक मोहन राठोड, सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पद्मश्री ग. गो. जाधव अध्यासनाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर पंडीत, प्रा. शिवाजी जाधव, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी, सहायक अभियंता शिरीष काटकर, मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक राहूल माने आदींची होती.

कलशेट्टी म्हणाले, माने यांच्याशी १९९१ पासूनचा परिचय असून शासनाच्या अनेक नाविन्यपूर्ण अभियनामध्ये आपण एकत्रितपणे अतिशय चांगले काम केले आहे. नम्र, मृदू, सदैव कार्यतत्पर, उत्तम जनसंपर्क असणा?्या श्री. माने यांना त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मोहन राठोड म्हणाले, शासकीय नोकरी मिळवणे जेवढे कठीण आहे त्यापेक्षाही चांगली कारकीर्द करणे कठीण आहे. माने यांनी ही कसोटी पार करत अत्यंत चांगली कारकीर्द उभी केली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी माने यांना निरोगी व दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

एस.आर. माने म्हणाले, पत्रकार,प्रसारमाध्यमे आणि माहिती विभाग हे दोन वेगळे घटक नसून ते एकाच नाण्याच्या केवळ दोन बाजू आहेत. माहिती व जनसंपर्क विभागात विविध ठिकाणी विविध पदावर काम करत असताना आलेली प्रत्येक जबाबदारी सकारात्मकपणे स्वीकारली. त्यातूनच अनेक चांगली माणसे जोडली गेली व त्यातूनच कारकीर्द बहरत गेली.

 

 

Web Title: Positive work style is R. Mane's career gambling: Kalshetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.