प्रचारसभांमध्ये घातपाताची शक्यता
By admin | Published: September 21, 2014 12:54 AM2014-09-21T00:54:41+5:302014-09-21T00:55:53+5:30
राज्य गुप्तवार्ताचा अहवाल : सतर्कतेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश; प्रतिनिधी पासचीही होणार तपासणी
Next
मुंबई : मुलुंड पूर्व येथील रहिवाशांनी माजी विधान परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांचा सत्कार केला. यावेळी सप्रा यांनी आपण मुलुंडमध्ये केलेल्या विकासकामांचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
विधान परिषद सदस्य असताना सप्रा यांनी मुलुंड पूर्वेकडील गोकूळ, एकता, त्रिमूर्ती, मंगलमूर्ती, सह्याद्री, मुलुंड लक्ष्मी, पंचरतन, प्रथमेश अशा अनेक सोसायटय़ांमध्ये पायाभूत सुविधा पुरविल्याबद्दल लक्ष्मी सोसायटी परिसरात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कैलास पाटील, प्राजक्ता कानडे, o्रीकृष्ण कांबळे आदी काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती.
सत्कार स्वीकारताना सप्रा यांनी विधान परिषद सदस्यपद मिळाल्यानंतर मुलुंडमध्ये तब्बल 21 कोटींची विकासकामे केल्याचे सांगितले. त्यात मुलुंडकरांसाठी ट्रॉमा सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सत्र न्यायालय, ग्राहक संरक्षण न्यायालय, नगर व दिवाणी न्यायालय, नाहूर रेल्वे पुलाचे रुंदीकरण, मुलुंड पश्चिमेकडे नवी स्मशानभूमी, ट्रक टर्मिनस, मुलुंड पूर्वेकडे एश्चुरीअन पार्क मंजूर करून घेतल्याचे तसेच तानसा जलवाहिनी परिसरातील बाधित पाचशे झोपडीधारकांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करून घेतल्याची माहिती दिली.
वन विभागात मोडणा:या झोपडीधारकांचे पुनर्वसन मुलुंडमध्येच होण्यासाठी वन विभागाची हद्द कमी करावी किंवा मुलुंडमधील सरकारी जागेवर शासनाच्या योजनेतून पुनर्वसन करावे, असे दोन पर्याय शासनाला दिले असून त्यावर विचार सुरू आहे. मुलुंड-बोरीवली मेट्रो किंवा मोनो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तसेच मुलुंडमध्ये नाटय़गृह, इंजिनीअरिंग व मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणीही केल्याचे
सप्रा यांनी यावेळी सांगितल़े (प्रतिनिधी)