कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद रद्द ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:04 PM2018-08-23T17:04:45+5:302018-08-23T17:27:29+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे.

The post of 19 corporators of Kolhapur corporation canceled | कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद रद्द ?

कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद रद्द ?

Next
ठळक मुद्दे जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने पद रद्द सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा दणका

कोल्हापूर -  कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. पद रद्द करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. 

दरम्यान , नगरसेवक निकाला बाबत संभ्रम आहे. सुप्रीम कोर्टाने  याचिका फेटाळली आहे, याचा अर्थ नगरसेवक पद रद्द झाले असा होत नाही. कारवाईचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून याचिका दाखल झाली होती.

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा दणका बसला आहे. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने नगरसेवक पद करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिल्या आहेत. 

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये अश्विनी रामाणे शमा मुल्ला, वृषाली कदम यांच्यासह सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, नीलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार, नियाज खान या नगरसेवकांचा समावेश आहे

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले कोल्हापूर मधील नगर सेवक

१. संदिप नेजदार
२. दीपा मगदूम
३. स्वाती येवलूजे
४. हसीना फरास
५. अश्विनी रामाणे
६. किरण शिराळे
७. सचिन पाटील
८. विजय खाडे पाटील
९. नियाझ खान
१०. मनीषा कुंभार
११. अश्विनी बारामते
१२. संतोष गायकवाड
१३. शमा मुल्ला
१४. सविता घोरपडे
१५. वृषाली कदम
१६. रीना कांबळे
१७. गीता गुरव
१८. कमलाकर भोपळे
१९. अफझल पिरजादे

Web Title: The post of 19 corporators of Kolhapur corporation canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.