महापालिकेतर्फे पोस्ट कोविड केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:04+5:302021-09-03T04:25:04+5:30
कोल्हापूर : कोरोना आजारावर मात केलेल्यांना विविध प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. काही जणांना धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, अंगदुखी, ...
कोल्हापूर : कोरोना आजारावर मात केलेल्यांना विविध प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. काही जणांना धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, अंगदुखी, छातीत दुखणे, धडधडणे, भीती वाटणे, चिडचिड होणे असे विकार होत आहेत. यावर वेळीच उपचार होण्यासाठी महापालिकेतर्फे शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर येथील किल्लेदार हॉस्पिटलच्या तळमजला येथे पोस्ट कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोमवार ते शनिवारी सकाळी १० ते २ या वेळेत हे केंद्र सुरू राहील. येथे कोरोना पश्चात होणाऱ्या आजारावर मोफत उपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेच्यावतीने राज्यातील पहिले कोरोना पश्चात आजारावरील उपचार, समुपदेशनाचे केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यावेळी ४०० हून अधिक कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी मोफत तपासणी करून औषधोपचार केले होते. आता पुन्हा असे केंद्र सुरू केले आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना काही त्रास होत असल्यास केंद्रात जाऊन औषधोपचार व समुपदेशन घ्यावे, असे महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.