गडहिंग्लजला पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीर, चांगल्या सवयी जोपासा.. देशाला सदृढ बनवा :अजय केणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:57 PM2020-11-09T17:57:23+5:302020-11-09T17:59:11+5:30

Coronavirus, gadhingalj, kolhapurnews, doctor कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर यासारख्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या चांगल्या सवयी जोपासूया आणि देशाला सदृढ बनवूया, असे आवाहन अ‍ॅस्टर आधार रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय केणी यांनी दिला.

Post Covid guidance camp to Gadhinglaj, cultivate good habits .. Strengthen the country: Ajay Keni | गडहिंग्लजला पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीर, चांगल्या सवयी जोपासा.. देशाला सदृढ बनवा :अजय केणी

गडहिंग्लज येथील शिबीरात डॉ. अजय केणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कोरोनामुक्त नागरिक व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देगडहिंग्लजला पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीरचांगल्या सवयी जोपासा.. देशाला सदृढ बनवा :अजय केणी

गडहिंग्लज : कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर यासारख्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या चांगल्या सवयी जोपासूया आणि देशाला सदृढ बनवूया, असे आवाहन अ‍ॅस्टर आधार रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय केणी यांनी दिला.

गडहिंग्लज महसूल विभागातर्फे आयोजित पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. डॉ.केणी म्हणाले, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये साथीची दुसरी लाट आली आहे. प्रगत असूनही ही राष्ट्रे हतबल झाली आहेत. भारतातही दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून आपण सतर्क राहिले पाहिजे.

यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिलीप आंबोळे, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्यासह आरोग्यसेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तहसिलदार दिनेश पारगे यांनी स्वागत केले. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आभार मानले.

त्यांची काळजी घ्या..

पोस्ट कोविड काळात रूग्णांची अधिक काळजी घ्यायला हवी. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबर समुपदेशन करायला हवे. नियमित सकस आहार, व्यायाम आणि मानसिक ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी त्यांना सहकार्य करावे, असा सल्ला केणींनी यावेळी दिला.

 

Web Title: Post Covid guidance camp to Gadhinglaj, cultivate good habits .. Strengthen the country: Ajay Keni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.