डाक सहायकाने उचलले ९१ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:35+5:302021-08-14T04:30:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : खातेदाराच्या खात्यावरील ९१ हजार ९५० रुपयांची रक्कम परस्पर काढून शासनासह खातेदाराची फसवणूक केल्याबद्दल डाक ...

The postal assistant picked up Rs 91,000 | डाक सहायकाने उचलले ९१ हजार रुपये

डाक सहायकाने उचलले ९१ हजार रुपये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : खातेदाराच्या खात्यावरील ९१ हजार ९५० रुपयांची रक्कम परस्पर काढून शासनासह खातेदाराची फसवणूक केल्याबद्दल डाक सहायकाविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. देवेश आडारकर (वय ३५, रा. शनिवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद वैशाली शिवाजी कापसे (वय ४५, सहायक अधीक्षक, डाकघर पश्चिम, रा. गजानन महाराजनगर ) यांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यातील संशयित देवेश आडारकर हे डाक सहायक म्हणून कळंबा उप डाकघर येथे लोकसेवक या पदावर कार्यरत आहेत. या उपडाकघरामध्ये शिवाजी पवार यांचे खाते एका डाकघरातून दुसऱ्या डाकघरामध्ये हस्तांतर करावयाचे होते. त्यासाठी लागणारी कागदपत्रे संशयित आडारकर यांनी पवार यांच्याकडून घेतली नाहीत. डाकघर बदलण्यासाठी प्रधान डाकपाल, शहर प्रधान डाकघर कोल्हापूर यांची मंजुरीही घेतली नाही. परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी नियमांचे उल्लंघन करून खातेदार पवार यांच्या खात्यावरील ९१ हजार ९५० इतकी रक्कम काढून घेतली. ही शासनाची व खातेदाराची फसवणूक केली. याबाबतच्या फिर्यादीवरून संशयित आडारकर यांच्यावर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: The postal assistant picked up Rs 91,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.