तीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:40 PM2019-10-17T13:40:34+5:302019-10-17T13:43:04+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी बुधवारअखेर तीन हजार ४१ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा ...

Postal voting done by officers and employees over three thousand | तीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

तीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

Next
ठळक मुद्देतीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान५९५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी बुधवारअखेर तीन हजार ४१ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५९५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

निवडणूक कर्तव्यावर जिल्ह्यात विविध ठिकाणी असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची निवडणूक प्रशासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे.

यामध्ये चंदगड मतदारसंघासाठी ३२८ अधिकारी-कर्मचारी, राधानगरी मतदारसंघासाठी ५१९ अधिकारी-कर्मचारी, कागल मतदारसंघासाठी ५३२ अधिकारी-कर्मचारी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी २२१ अधिकारी-कर्मचारी, करवीर मतदारसंघासाठी ४०७ अधिकारी-कर्मचारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी १२४ अधिकारी-कर्मचारी, शाहूवाडी मतदारसंघासाठी १४३ अधिकारी-कर्मचारी, हातकणंगले मतदारसंघासाठी २८१ अधिकारी-कर्मचारी, इचलकरंजी मतदारसंघासाठी १३१ अधिकारी-कर्मचारी आणि शिरोळ मतदारसंघासाठी ३४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला आहे.
 

 

Web Title: Postal voting done by officers and employees over three thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.