कलायोगी कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:28+5:302021-07-23T04:16:28+5:30
आमदार जाधव म्हणाले, कलायोगी यांनी सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रास महाराष्ट्र राज्य शासनाने अधिकृत चित्र ...
आमदार जाधव म्हणाले, कलायोगी यांनी सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रास महाराष्ट्र राज्य शासनाने अधिकृत चित्र म्हणून राज मान्यता दिली. छत्रपतींच्या या चित्राची तत्कालीन शासनाने राॅयल्टी देऊ केली होती. मात्र, कांबळे यांनी देवाचे चित्र काढण्यासाठी पैसे घ्यावयाचे नसतात म्हणून त्यांनी ती विनम्रपणे नाकारली. अशा या महान चित्रकाराचा यथोचित गौरव करणे गरजेचे आहे. शासनाने त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करावे. त्याकरिता मी स्वत: याबाबतचा पाठपुरावा करेन, असेही त्यांनी आश्वासित केले.
यावेळी महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, नारायण भोसले, सहायक अभियंता सुरेश पाटील, दादा पाटोळे, विनायक साळोखे, प्रकाश खिरुगडे, रत्नदीप कुंडले, अशोक कांबळे, बबन कांबळे, दिलीप कांबळे, बंडोपंत साबळे, पद्माकर वरणे, शरद गौड, विलास गौड, चित्रकार राजू गौड आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २२०७२०२१-कोल-कांबळे
ओळी : कोल्हापूर महापालिकेतर्फे कलायोगी जी.कांबळे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी त्यांच्या शिल्पाकृतीला आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.