नगरपालिकेची ऑनलाईन सभेतील सर्व विषयांना स्थगिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:51+5:302021-08-14T04:30:51+5:30

येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ६ ऑगस्टला झाली. ही सभा ऑनलाईन की, ऑफलाईन याबाबत आदल्या दिवशीपर्यंत वाद-विवाद सुरू होते. सर्व ...

Postpone all issues in the online meeting of the municipality | नगरपालिकेची ऑनलाईन सभेतील सर्व विषयांना स्थगिती द्या

नगरपालिकेची ऑनलाईन सभेतील सर्व विषयांना स्थगिती द्या

Next

येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ६ ऑगस्टला झाली. ही सभा ऑनलाईन की, ऑफलाईन याबाबत आदल्या दिवशीपर्यंत वाद-विवाद सुरू होते. सर्व विरोधी सदस्यांनी ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्याची मागणी केली होती तरीही नगराध्यक्षा स्वामी यांनी ऑनलाईन सभा घेतली. सभेत विरोधी सदस्यांना चर्चेत सहभागी करून घेतले नाही. विषयपत्रिकेवरील ३१ पैकी २८ विषय विरोधकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून मंजूर करण्यात आले. सभेत ४३ सदस्य सहभागी झाले होते. परंतु त्यातील २३ सदस्यांना नेमके काय झाले, हे समजले नाही. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर असून, या सभेतील विषय रद्द करावेत व पुढील सभेत त्यावर सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सागर चाळके, संजय कांबळे, मदन झोरे, आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

दरम्यान, मुख्याधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावार यांनी शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Postpone all issues in the online meeting of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.