शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By admin | Published: April 4, 2016 12:10 AM2016-04-04T00:10:55+5:302016-04-04T00:18:05+5:30
शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली माहिती
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि. १०) होणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या १० एप्रिलला होणाऱ्या एकूण दहा पेपरमधील तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
राज्यसेवा पूर्व परीक्षा १० एप्रिलला असल्याने शिवाजी विद्यापीठाने परीक्षांचे आयोजन करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आली आहे. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दहा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे.
वर्षे विषय सुधारित तारीख, वेळ
१) बी.ए. इतिहास पेपर-६ दि. ६ मे २०१६, १२ ते २
सेमिस्टर - ४ (फ्रीडम स्ट्रगल आॅफ
इंडिया -२) भूगोल पेपर-६
(शेती भूगोल) दि. ६ मे २०१६, ३ ते ५
भाषाशास्त्र पेपर - ६ दि. ६ मे २०१६, ३ ते ५
होम सायन्स पेपर - ६ दि. ६ मे २०१६, ३ ते ५
२) बी.एस्सी. रसायनशास्त्र पेपर - ३ दि. १८ मे २०१६, १२ ते २
सेमिस्टर - २ कॉम्प्युटर सायन्स पेपर - ३ दि. १८ मे २०१६, ३ ते ५
३) बी.सी. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
एस. सेमिस्टर - ५ भाग - १ (जुना) दि. २७ एप्रिल २०१६, ३ ते ५
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
भाग - १२ (नवा) दि. २७ एप्रिल २०१६, ३ ते ५
४) एम.बी.ए. से.२ मार्केटिंग मॅनेजमेंट दि. २१ एप्रिल २०१६, ३ ते ६
५) एम. बी. आय.टी. अँड सिस्टीम
सेमिस्टर - ३ मॅनेजमेंट इलेक्टिव्ह - ५ दि. २१ एप्रिल २०१६, ३ ते ६