प्लॅस्टर मूर्तीवरील बंदीला स्थगिती, कुंभार समाजाने मानले शासनाचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:02 PM2021-01-14T12:02:18+5:302021-01-14T12:06:00+5:30

environment Kolhapur- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी केंद्र शासनाने स्थगित केल्याबद्दल कुंभार समाजाने मंत्री प्रकाश जावडेकर व आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत. याबाबतचे निवेदन कुंभार समाज सामाजिक संस्थेने बुधवारी प्रसिद्ध केले.

Postponement of the ban on plaster idols, the potter community thanked the government | प्लॅस्टर मूर्तीवरील बंदीला स्थगिती, कुंभार समाजाने मानले शासनाचे आभार

प्लॅस्टर मूर्तीवरील बंदीला स्थगिती, कुंभार समाजाने मानले शासनाचे आभार

Next
ठळक मुद्देप्लॅस्टर मूर्तीवरील बंदीला स्थगितीकुंभार समाजाने मानले शासनाचे आभार

कोल्हापूर : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी केंद्र शासनाने स्थगित केल्याबद्दल कुंभार समाजाने मंत्री प्रकाश जावडेकर व आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत. याबाबतचे निवेदन कुंभार समाज सामाजिक संस्थेने बुधवारी प्रसिद्ध केले.

पीओपी मूर्तींवरील बंदी शासनाने मागे घ्यावी, यासाठी कुंभार समाजाच्यावतीने २१ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. लोकप्रतिनिधींना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते.

कुंभार समाजाच्या भवितव्याचा विचार करुन केंद्राने पीओपी मूर्तींच्या बंदीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. याबद्दल कुंभार समाजाच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.

Web Title: Postponement of the ban on plaster idols, the potter community thanked the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.