उत्तूरला पोल्ट्री पाणी घुसले; ३ हजार पिले दगावली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:52+5:302021-07-23T04:16:52+5:30
अधिक माहिती अशी, उत्तूरकर यांनी उत्तूर-चव्हाणवाडी मार्गावर ओंकार पोल्ट्री फॉर्म नावाने पहिल्यांदाच पोल्ट्री सुरू केली होती. त्याने तीन ...
अधिक माहिती अशी, उत्तूरकर यांनी उत्तूर-चव्हाणवाडी मार्गावर ओंकार पोल्ट्री फॉर्म नावाने पहिल्यांदाच पोल्ट्री सुरू केली होती. त्याने तीन हजार पिले आणून व्यवसाय सुरू केला होता.
सात दिवसांच्या पिलांच्या शेडमध्ये नाल्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात घुसल्याने तीन हजार पिलांचा बुडून मृत्यू झाला. उत्तूरकर हे आजरा कारखान्यात कामास होते.
आजरा कारखाना बंद असल्याने कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. सकाळी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पाणी पोल्ट्रीत घुसले. पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे निभाव टिकला नाही. पोल्ट्रीतील खाद्य, औषधे, पिले असे तीन लाखांचे नुकसान झाले.