देशाचे अर्थकारण बदलण्याची ताकद दुग्ध व्यवसायात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:11+5:302021-02-13T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हेरले : भारत दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण झालेला देश असून, देशाचे अर्थकारण बदलण्याची ताकद दुग्ध व्यवसायात आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले : भारत दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण झालेला देश असून, देशाचे अर्थकारण बदलण्याची ताकद दुग्ध व्यवसायात आहे, असे मत गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी व्यक्त केले.
मौजेवडगाव (ता. हातकणंगले) येथील कामधेनू दूध संस्थेने दररोज २५०० लिटर दूध संकलनाचा टप्पा ओलांडला. याबद्दल कलश पूजन आणि किसान विमा धनादेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी घाणेकर म्हणाले की, दूध महापूर योजनेमुळे गावाचा चेहरामोहरा बदलला. गावागावात लोकशिक्षणाचे काम दूध संघामुळे झाले. गोकुळने दुधाच्या धंद्यात शास्त्रोक्त पध्दत आणली. कामधेनू दूध संस्थेनेही दररोजचा पाच हजार लिटरचा टप्पा गाठावा. यावेळी सहायक निबंधक गजेंद्र देशमुख, शरद तुरंबेकर, के. वाय. पाटील, दीपक शुक्रे, राजकुमार थोरवत, श्रीकांत सावंत, विजय मगदूम यांनी मनोगत व्यक्त केल.
यावेळी अध्यक्षा उमा चौगले, उपाध्यक्ष महंमद हजारी, सरपंच काशिनाथ कांबळे, किरण चौगुले, उपसरपंच सुभाष अकिवाटे, अमीर हजारी, मानसिंग रजपूत, महेश कांबरे, विजय गोरड, उदय चौगुले, बाळासाहेब बारगीर, रमेश लोंढे, संजय चौगुले, बशीर हजारी, संजय सावंत, गुंडा कांबरे, सुशिला गोरड, बेबी हजारी, राजाराम सावंत, पूजा चौगुले, सुभाष चौगुले, हसन बारगीर, जनार्दन कांबळे, विनायक चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
१२ हेरले मिल्क
फोटो : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील कामधेनू दूध संस्थेच्यावतीने कलश पूजन आणि किसान विमा धनादेश वाटप करत असताना सहायक निबंधक गजेंद्र देशमुख, डावीकडून उपाध्यक्ष महंमद हजारी, डी. व्ही. घाणेकर, अध्यक्षा उमा चौगले व इतर उपस्थित होते.