शिक्षण व्यवस्थेतील राजकारणावर भाष्य करणारे ‘सत्तासंघर्ष’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:34+5:302021-09-07T04:30:34+5:30
कोल्हापूर : डाॅ. स्वप्नील बुचडेलिखित ‘सत्तासंघर्ष’ हे नाटक शिक्षण क्षेत्रातील राजकारणावर सडेतोड भाष्य करणारे आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात मराठी ...
कोल्हापूर : डाॅ. स्वप्नील बुचडेलिखित ‘सत्तासंघर्ष’ हे नाटक शिक्षण क्षेत्रातील राजकारणावर सडेतोड भाष्य करणारे आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात मराठी वाङ्मयात हे एक अतिशय महत्त्वाचे नाटक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक अरुण मिरजकर यांनी केले. आदित्य सभागृहात आयोजित केलेल्या ‘सत्तासंघर्ष’ या निर्मिती प्रकाशन संस्थेच्या नाटकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते.
मिरजकर म्हणाले, हे नाटक राजकारणाच्या मोठ्या परिघाला स्पर्श करणारे आहे. वास्तवाची मांडणी करणारे नाटक वाचकाला चकवा देते. सध्या साहित्यिक व्यवहार ठप्प झाले असताना नाटक प्रकाशित करण्याचे धाडस बुचडे यांनी केले आहे. प्रस्थापितांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आणि त्यातील दाहकता या नाटकातून समोर आली आहे. यावेळी समीक्षक डाॅ. गिरीश मोरे, प्राचार्य डाॅ. राजेखान शानेदिवाण, श्रीराम साळुंखे यांनी या नाटकाबद्दल मत व्यक्त केले. लेखक डाॅ. बुचडे यांनी नाटकाचा एकूण लेखनप्रवास मांडला.