शेतीपंपांना दिवसा दहा तास वीज द्या _ संजय मंडलिक यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:19 AM2020-04-14T11:19:19+5:302020-04-14T11:21:50+5:30
कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे औद्योगिक क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद असून, या विजेचा वापर शेतीपंपासाठी करावा व दिवसा दहा तास वीज ...
कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे औद्योगिक क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद असून, या विजेचा वापर शेतीपंपासाठी करावा व दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली.
सध्या ‘कोविड -१९’मुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता औद्योगिक क्षेत्र बंद आहे. त्यामुळे वीज वापर कमी झाला आहे. शेतकऱ्यांना आता दोन टप्प्यात वीजपुरवठा केला जातो. त्यांना रात्रीचा वीजपुरवठा कमी करून दिवसाला दहा तास वीज पुरवठा करावा. औद्योगिक वापरातील वीज शेतकऱ्यांसाठी दिवसाची उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली.
पेट्रोलपंपावरील कर्मचाºयांनाही विमा कवच द्या
केंद्र सरकारने ग्रामपंचायतीसह इतर कर्मचा-यांना ५० लाखांपर्यंतचे विमा कवच दिले आहे. ‘कोरोना’च्या या लढाईत पेट्रोलपंप व गॅस पुरवठा करणारे कर्मचारीही पुढे आहेत. त्यांनाही विम्याचे हे कवच द्यावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.