वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:45 PM2021-05-17T12:45:41+5:302021-05-17T12:47:27+5:30

Cyclone Rain Mecb Kolhapur : जोरदार वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरातील विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडून विद्युत तारा, खांड तुटण्याची शक्यता गृहीत धरून विद्युत पुरवठा खंडित केला जात होता.

The power supply to Kolhapur city was also disrupted due to wind | वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडित

वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडित

Next
ठळक मुद्देवाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडितजोरदार वारे आणि पावसाचा फटका शहरातील वृक्षांना

कोल्हापूर : जोरदार वाऱ्यामुळे शहरातील विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडून विद्युत तारा, खांड तुटण्याची शक्यता गृहीत धरून विद्युत पुरवठा खंडित केला जात होता.

जोरदार वारे आणि पावसाचा फटका शहरातील वृक्षांना बसला. शहराच्या विविध भागात दहा वृक्ष कोसळले, तर अनेक ठिकाणी फांद्या तुटल्या. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेले वृक्ष रस्त्यातून बाजूला केले.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊ घालेल्या चक्रीवादळामुळे शनिवारपासून शहरात जोरदार वारे वाहत आहेत.

रविवारीही दिवसभर जोरदार वारे वाहत होते. तसेच संततधार पाऊस कोसळत होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. अधूनमधून मोठी सर येत होती. रविवारी दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. जोराच्या वाऱ्यामुळे शहरातील उद्यमनगर, ताराबाई पार्क, महाडिक पेट्रोल पंप, हॉकी स्टेडियमरोड, राजारामपुरी १० वी गल्ली, जरगनगर, शाहुपरी गुजराती हायस्कूल, सदरबाजार या परिसरातील वृक्ष कोसळले. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत.

सदरबाजार परिसरात जिल्हा परिषद क्वॉर्टर्स असून तेथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या घरावर नीलगिरीचे एक उंच झाड कोसळले. त्यामुळे घराचे किरकोळ नुकसान झाले. मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जाऊन कोसळलेले झाड बाजूला केले. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे रेनट्री, गुलमोहराच्या झाडांची पाने, फुले, शेंगा रस्त्यावर पडून त्यामुळे रस्त्यावर दलदल झाली होती.

कोल्हापूर शहर परिसरात वाऱ्याचा वेग तुलनेने थोडा कमी झाल्यानंतर दोन वाजता पावसाचा जोर चढला. हा जोर सायंकाळपर्यत टिकून होता. दोन दिवस जोराने वारे, संततधार पाऊस कोसळत असला तरी हवेतील उष्मा काही कमी झालेला नाही. पावसाबरोबरच उष्माही तेवढाच जाणवत होता.
 

Web Title: The power supply to Kolhapur city was also disrupted due to wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.