सत्तेसाठी जोरदार चुरस

By admin | Published: March 27, 2016 11:42 PM2016-03-27T23:42:00+5:302016-03-28T00:13:17+5:30

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : नेते व समर्थकांची मतदान केंद्रावर गर्दी

Powerful punching power | सत्तेसाठी जोरदार चुरस

सत्तेसाठी जोरदार चुरस

Next

गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यासाठी ७९.८५ टक्के इतके मतदान शांततेत झाले. दिवसभर मतदान चुरशीने होताना दिसले.
मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी दुचाकी, तीनचाकीसह चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. वयोवृद्धांसह महिलांनीही उत्साहात मतदान केले.
निवडणुकीतील चुरस आणि मतदारांच्या उत्साहामुळे मतदानाची आकडेवारी वाढली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) संजय पवार तर सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हणुमंत पाटील, सहाय्यक निबंधक ए. एच. भंडारी व धनंजय पाटील यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

नेत्यांची रपेट..समर्थकांचा तळ..!
आमदार मुश्रीफ व कुपेकर, अ‍ॅड. शिंदे आणि डॉ. शहापूरकर व चव्हाण यांनी तालुक्यातील बहुतेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली. राष्ट्रवादीचे युवराज पाटील, शहापूरकरांचे समर्थक शिवसेनेचे संजय घाटगे व विजय देवणे, भाजपचे बाबा देसाई व परशुराम तावरे ही मंडळी दिवसभर गडहिंग्लजमध्ये तळ ठोकून होती.


संस्था गटात दोघांचाही दावा
संस्था गटात शहापूरकर पॅनेलचे उमेदवार
स्व. राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद हत्तरकी आणि शिंदे-मुश्रीफ-कुपेकर आघाडीचे उमेदवार मनोहर पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी गटा-गटाने येऊन मतदान केले. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी गडहिंग्लज शहरासह तालुकाभर फटाके वाजवून विजयाचा दावा केला. त्याची दिवसभर चर्चा झाली.

Web Title: Powerful punching power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.