जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 02:04 PM2019-12-02T14:04:28+5:302019-12-02T14:06:13+5:30
‘पाव्हणं जरा जपून, एड्स आला लपून’, एड््स जाणा, एड्स टाळा, ‘लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची कुंडली पाहा ’ अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून रविवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली.
कोल्हापूर : ‘पाव्हणं जरा जपून, एड्स आला लपून’, एड््स जाणा, एड्स टाळा, ‘लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची कुंडली पाहा ’ अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून रविवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली.
या प्रभात फेरीची सुरुवात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अभिनेते आनंद काळे, आदींच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.
यानिमित्त बोलताना महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, एड्स जनजागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. एच.आय.व्ही. संसर्गितांना धीर दिला पाहिजे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, जनजागृती आणि प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे.
शहराच्या प्रमुख मार्गांवरून जनजागृतीपर घोषणा देत ही प्रभात फेरी फिरून पुन्हा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात विसर्जित करण्यात आली. सुरूवातीला आंध्रातील डॉ. प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या फेरीत डॉ. विलास देशमुख, डॉ. राजेश पवार, डॉ. हर्षला वेदक, डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह एन.एस.एस.,एमसीसी महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्यातर्फे रविवारी सकाळी सीपीआर रुग्णालयातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अभिनेते आनंद काळे, आदी सहभागी झाले होते.