थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी फलकाद्वारे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 PM2021-05-12T16:10:55+5:302021-05-12T16:12:40+5:30

कोल्हापूर : भावा आता तरी शहाणा हो! कोरोनाचा विळखा वाढत आहे, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकू नको, अशा आशयाचे फलक कोल्हापूर ...

Prabodhan through plaque for spit-free Kolhapur | थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी फलकाद्वारे प्रबोधन

कोल्हापूरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी थुंकीविरोधी चळवळीमार्फत फलक लावण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे हवालदार संदीप निळपणकर, दीपा शिपूरकर, गीता हसुरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे ॲन्टीस्पिटींग मूव्हमेंटचा उपक्रम लवकरच मोक्याच्या ठिकाणी लागणार फलक

कोल्हापूर : भावा आता तरी शहाणा हो! कोरोनाचा विळखा वाढत आहे, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकू नको, अशा आशयाचे फलक कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लाउन त्यामार्फत प्रबोधन करण्यावर कोल्हापूरातील ॲन्टीस्पिटिंग चळवळीने भर दिला आहे. बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थुंकीमुक्त कोल्हापूरचे प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले. चळवळीमार्फत लवकरच शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रबोधनात्मक फलक लावण्यात येणार आहेत.

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक अजूनही बेजबाबदारपणे थुंकताना आढळत आहेत. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही प्राथमिक जबाबदारी बनली आहे. रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे, हे अजूनही न ठसल्यामुळे अजूनही बहुतांश नागरिक बेजबाबदारपणे थुंकताना आढळत आहेत.

यातून केवळ कोरोना विषाणूचाच नव्हे तर अनेक रोगांचाही वेगाने प्रसार होतो .थुंकणाऱ्या नागरिकांमुळे मौखिक व इतर गंभीर आजारांचा धोकाही आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याबरोबर समाजाचेही आरोग्य चांगले रहावे, यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजे, यासाठी कोल्हापूरातील ॲन्टीस्पिटिंग मूव्हमेंटने कंबर कसली आहे.

कोल्हापुरातून सुरू झालेली थुंकीमुक्त चळवळ आता फलकांच्या माध्यमातून प्रबोधन करू पाहत आहे. याची सुरुवात बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झाली. यावेळी वाहतूक शाखेचे हवालदार संदीप निळपणकर यांच्यासह चळवळीच्या दीपा शिपूरकर, गीता हसुरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या फलकाची संकल्पना संजय शिंदे, चंद्रकांत हल्याळ, फिरोज शेख, तुषार दिवेकर यांची आहे.

मोक्याच्या ठिकाणी लागणार प्रबोधनात्मक फलक

अमित सांगावकर यांनी त्यांच्या व्यावसायिक फलकाची जागा उपलब्ध करुन देऊन या सामाजिक चळवळीस पाठबळ दिले.भविष्यात रोटरीच्या सहाय्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी चळवळी मार्फत असे प्रबोधनात्मक फलक लावण्यात येणार आहेत. यापूर्वी चळवळीमार्फत स्टीकर्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.


रस्ते हे चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी असतात, रस्त्यावर थुंकणे हे मुळातच आपल्या संस्कृती, सभ्यतेचे अवमान करणारे ठरते. वंदे मातरम , म्हणजेच धरतीस वंदन, मग तिथे थुंकणे हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रशासनानेही प्रबोधनाचे होर्डिंग्ज उभारावेत, थुंकणाऱ्यांविरोधात दंडनीय कारवाईसह गुन्हेच नोंदवावेत, धडक कारवाईनेच यास प्रतिबंध करता येऊ शकेल. प्रशासनाची ही मोठी जबाबदारी आहे, असे चळवळीच्या कार्यकर्त्यांना वाटते.
- दीपा शिपूरकर,
संस्थापक, ॲन्टीस्पिटिंग मूव्हमेंट, कोल्हापूर.

Web Title: Prabodhan through plaque for spit-free Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.