थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी फलकाद्वारे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:29+5:302021-05-13T04:23:29+5:30
कोल्हापूर : भावा आता तरी शहाणा हो! कोरोनाचा विळखा वाढत आहे, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकू नको, अशा आशयाचे फलक कोल्हापूर ...
कोल्हापूर : भावा आता तरी शहाणा हो! कोरोनाचा विळखा वाढत आहे, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकू नको, अशा आशयाचे फलक कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लावून त्यामार्फत प्रबोधन करण्यावर कोल्हापुरातील अँटिस्पिटिंग चळवळीने भर दिला आहे. बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थुंकीमुक्त कोल्हापूरचे प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले. चळवळीमार्फत लवकरच शहरातील मोक्याच्या ठिकाणी प्रबोधनात्मक फलक लावण्यात येणार आहेत.
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक अजूनही बेजबाबदारपणे थुंकताना आढळत आहेत. यासाठी स्वयंशिस्त पाळणे ही प्राथमिक जबाबदारी बनली आहे. रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे, हे अजूनही न ठसल्यामुळे अजूनही बहुतांश नागरिक बेजबाबदारपणे थुंकताना आढळत आहेत. यातून केवळ कोरोना विषाणूचाच नव्हे, तर अनेक रोगांचाही वेगाने प्रसार होतो. थुंकणाऱ्या नागरिकांमुळे मौखिक व इतर गंभीर आजारांचा धोकाही आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याबरोबर समाजाचेही आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजे, यासाठी कोल्हापुरातील अँटिस्पिटिंग मूव्हमेंटने कंबर कसली आहे.
कोल्हापुरातून सुरू झालेली थुंकीमुक्त चळवळ आता फलकांच्या माध्यमातून प्रबोधन करू पाहत आहे. याची सुरुवात बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झाली. यावेळी वाहतूक शाखेचे हवालदार संदीप निळपणकर यांच्यासह चळवळीच्या दीपा शिपूरकर, गीता हसूरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या फलकाची संकल्पना संजय शिंदे, चंद्रकांत हल्याळ, फिरोज शेख, तुषार दिवेकर यांची आहे.
मोक्याच्या ठिकाणी लागणार प्रबोधनात्मक फलक
अमित सांगावकर यांनी त्यांच्या व्यावसायिक फलकाची जागा उपलब्ध करून देऊन या सामाजिक चळवळीस पाठबळ दिले. भविष्यात रोटरीच्या साहाय्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी चळवळीमार्फत असे प्रबोधनात्मक फलक लावण्यात येणार आहेत. यापूर्वी चळवळीमार्फत स्टीकर्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.
कोट
रस्ते हे चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी असतात, रस्त्यावर थुंकणे हे मुळातच आपल्या संस्कृती, सभ्यतेचे अवमान करणारे ठरते. वंदे मातरम्, म्हणजेच धरतीस वंदन, मग तिथे थुंकणे हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रशासनानेही प्रबोधनाचे होर्डिंग्ज उभारावेत, थुंकणाऱ्यांविरोधात दंडनीय कारवाईसह गुन्हेच नोंदवावेत, धडक कारवाईनेच यास प्रतिबंध करता येऊ शकेल. प्रशासनाची ही मोठी जबाबदारी आहे, असे चळवळीच्या कार्यकर्त्यांना वाटते.
दीपा शिपूरकर,
संस्थापक, अँटिस्पिटिंग मूव्हमेंट, कोल्हापूर.
--------------------------------------------
फोटो : 12052021-Kol-Antispitting movement Hoarding
फोटो ओळी : कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी थुंकीविरोधी चळवळीमार्फत फलक लावण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे हवालदार संदीप निळपणकर, दीपा शिपूरकर, गीता हसूरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
------------------------------
(बातमीदार : संदीप आडनाईक)
12052021-Kol-Antispitting movement Hoarding
===Photopath===
120521\12kol_1_12052021_5.jpg
===Caption===
12052021-Kol-Antispitting movement Hoarding कोल्हापूरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी थुंकीविरोधी चळवळीमार्फत फलक लावण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे हवालदार संदीप निळपणकर, दीपा शिपूरकर, गीता हसुरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.