प्रॅक्टिस ‘अ’ची ‘शिवाजी’वर मात अटल चषक फुटबॉल : टायब्रेकरवर निर्णय, सामन्यात शेवटपर्यंत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:17 AM2018-04-04T01:17:28+5:302018-04-04T01:17:28+5:30
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला.
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला.
शाहू स्टेडियमवर नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी प्रॅक्टिस क्लब ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘प्रॅक्टिस’चे वर्चस्व राहिले. ‘पॅ्रक्टिस’च्या
माणिक पाटीलच्या पासवर कैलास पाटीलची गोल करण्याची नामी संधी हुकली.
त्यानंतर ‘प्रॅक्टिस’च्याच इंद्रजित चौगुलेने दिलेल्या पासवर सागर चिलेने हेडद्वारे मारलेला फटकाही ‘शिवाजी’चा गोलरक्षक आकाश मेस्त्रीने परतावून लावला. ‘प्रॅक्टिस’कडून राहुल पाटील, फॅनियन, सागर चिले यांच्याकडून
गोल करण्याचे अनेक प्रयत्न
झाले. मात्र, त्यांना ‘शिवाजी’चा गोलरक्षक आकाश अडसर ठरत होता. त्याने ‘प्रॅक्टिस’च्या गोल करण्याच्या अनेक संधी कधी डावीकडे झेपावत, तर कधी हाताने पंच करीत बाहेर काढल्या.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोल करून आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवले. मात्र, यात ‘प्रॅक्टिस’कडून राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, कैलास पाटील, सागर चिले यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, ‘शिवाजी’च्या सजग गोलरक्षकापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ‘शिवाजी’कडून सुमित
जाधव, योगेश धामोणे, प्रदीप पाटील, अक्षय सरनाईक, आकाश भोसले यांनी गोल करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ‘प्रॅक्टिस’च्या बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. उत्तरार्धाच्या शेवटपर्यंत ‘प्रॅक्टिस’कडून सातत्याने चढाया झाल्या; पण त्यांना गोल करण्यात अखेरपर्यंत यश आले नाही. संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने मुख्य पंच राजू राऊत यांनी टायब्रेकरचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार झालेल्या टायब्रेकरवर प्रॅक्टिस क्लबने ३-२ अशा गोलफरकाने शिवाजी तरुण मंडळवर मात करीत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
हाणामारीचे
ग्रहण सुटेना
सामन्यादरम्यान फुटबॉल समर्थकांकडून टेंबे रोडच्या कोपऱ्यातील गॅलरीतून मैदानात पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यानंतर सामन्याच्या अखेरीस याच गॅलरीत काही समर्थकांत जुंपली. ही हाणामारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व त्यांच्या सहकाºयांनी प्रेक्षक गॅलरीत प्रवेश करीत हुल्लडबाजांना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर थांबली. सामन्यानंतर मैदानाबाहेरही समर्थकांत जुंपण्याची शक्यता गृहीत धरून तेथेही बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक स्पर्धेवेळी काही हुल्लडबाज प्रेक्षक हाणामारी व गोंधळ घालतात. अशा हुल्लडबाजांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खºया फुटबॉलप्रेमींकडून होत आहे.
दोन्हीही
संघांकडून दर्जेदार
खेळाचे दर्शन
‘शिवाजी’कडून प्रदीप पाटील, नितांत कोराणे यांनी गोल केले, तर सुमित जाधव, योगेश धामोणे, अक्षय सरनाईक यांचे फटके बाहेर गेले.
‘प्रॅक्टिस’कडून प्रतीक बदामे, कैलास पाटील, माणिक पाटील यांनी गोल केले; तर राहुल पाटील, फॅनियन यांचे फटके वाया गेले.