आजरा क्रीडासंकुलचे काम पीडब्ल्यूडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:59 PM2017-08-06T23:59:38+5:302017-08-06T23:59:43+5:30

Practical work of PRA | आजरा क्रीडासंकुलचे काम पीडब्ल्यूडीकडे

आजरा क्रीडासंकुलचे काम पीडब्ल्यूडीकडे

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आजरा तालुका क्रीडासंकुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजरा तालुका क्रीडासंकुल समितीचे अध्यक्षपदही मंत्री पाटील यांनी स्वीकारले आहे.
‘प्रत्येक तालुक्याला एक क्रीडासंकुल’ या योजनेतून आजरा तालुका क्रीडासंकुलासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला; परंतु गेली अनेक वर्षे तेथील झाडे तोडणे, जमीन मोजून घेणे, विजेचे खांब काढणे हेच काम सुरू आहे. खात्यावर पैसे पडून आहेत; परंतु विविध खात्यांमध्ये समन्वय नसल्याने पाठपुराव्याअभावी हे काम ठप्पच होते.
अशातच आजरा तालुका क्रीडासंकुल समितीला अध्यक्षच नसल्याने याबाबत बैठकाही होत नव्हत्या. आमदार प्रकाश आबिटकर हे भुदरगड, राधानगरी आणि आजरा या तालुक्यांचे आमदार आहेत. भुदरगड, राधानगरी तालुक्यांच्या क्रीडासंकुल समितीचे ते अध्यक्ष आहेत. तिसºया समितीचे अध्यक्षपद त्यांना नियमाने स्वीकारता येत नव्हते.
परिणामी क्रीडासंकुलाचे काम पुढे सरकत नव्हते. शिवसेनेने हा प्रश्न उपस्थित करून आंदोलन केले होते. तसेच जिल्हा क्रीडाधिकाºयांना निवेदनही दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात क्रीडासंकुलबाबत सविस्तर बैठक झाली. क्रीडा विभागाकडील मनुष्यबळाचा विचार करता, त्यांच्याकडून हे काम गतीने होणार नसल्याने ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ८७ लाख रुपयांमधून संरक्षक भिंत आणि अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक पूर्ण होणार आहे. अन्य कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून तो द्यावा, असे निवेदन यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, चंदगड विधानसभा सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, संभाजी पाटील, राजू सावंत यांनी पालकमंत्र्यांना दिले. त्यानुसार या क्रीडासंकुलासाठी वाढीव निधी देणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी यावेळी सध्यस्थिती सांगितली.
यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, एस. आर. पाटील, आजºयाच्या तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर, विजय कोंडूसकर, विजय डोंगरे, नेताजी कातकर उपस्थित होते.
‘लोकमत’ चा पाठपुरावा
आजरा तालुक्यातील रखडलेले क्रीडासंकुल पूर्ण करण्यासाठी चंद्रकांतदादांनीच आजºयाच्या समितीचे अध्यक्षपद स्वीकारून आदर्श क्रीडा संकुल उभारून दाखवावे, अशी आजरा तालुक्यातील क्रीडाप्रेमींची मागणी असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यांनी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारले असल्याचे आजच्या या बैठकीत स्पष्ट झाले.

Web Title: Practical work of PRA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.