इचलकरंजीत पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:48+5:302021-05-27T04:24:48+5:30
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी घाटावर नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीने महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा व ...
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी घाटावर नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीने महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा व यांत्रिक बोटीचा नदीपात्रात सराव घेण्यात आला.
सन २००५ व २०१९ मध्ये महापुरामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितीची हानी टाळण्यासाठी आतापासूनच नियोजनास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली होती. यावेळी इचलकरंजीतील पूरपरिस्थितीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच जिल्हाधिकारी देसाई यांनी नैसर्गिक आपत्तीसंदर्भात नगरपालिकेस आदेश दिले आहेत. त्यानुसार महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडील अत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा आणि यांत्रिक बोट यांची नदीपात्रात सराव चाचणी घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून साहित्याच्या सुसज्जतेची पाहणी करण्यात आली. सरावप्रसंगी नगरपालिकेचे संजय कांबळे, हरीष कांबळे, सुखदेव जावळे, आकाश आवळे, कर्मचारी यांत्रिक रेस्क्यू बोटचे जवान उपस्थित होते.
फोटो ओळी
२६०५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीपात्रात बोटीतून सराव केला.