अभ्यासक डॉ. पद्मनाभजी जैनी यांचे कॅलिफोर्निया येथे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:32+5:302021-05-27T04:26:32+5:30
त्यांच्या निधनाने पाश्चात्य देशामधील जैन धर्माचे अभ्यासक व भारतीय संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक व विचारवंत गमावल्याची भावना ...
त्यांच्या निधनाने पाश्चात्य देशामधील जैन धर्माचे अभ्यासक व भारतीय संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक व विचारवंत गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ.जैनी हे गुरुकुल संस्थापक १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांचे शिष्य होते. बाहुबली संस्थेशी अखेरपर्यंत त्यांची नाळ जुडलेली होती. त्यांचा जन्म कर्नाटकातील तुलूनाडू भागातील प्रसिद्ध जैन क्षेत्र मूडबिद्रीजवळील नेल्लिकारयेथे एका दिगंबर जैन कुटुंबात झाला.
वाराणसी, अहमदाबाद, लंडन व १९७२ पर्यंत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात व त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून १९९४ ला सेवानिवृत्त झाले होते. जैन, बौद्ध त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते.
बौद्ध धर्मातील संशोधन केल्याबद्दल १९५१ साली श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान सेनानायके यांनी 'त्रिपिटिकाचार्य ही पदवी त्यांना प्रदान केली होती. मराठी, तुळू, कन्नड, हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषांसोबतच पाली, प्राकृत, संस्कृत अर्धमागधी, अपभ्रंश अशा प्राचीन अभिजात भाषांचे उत्तम जाणकार होते.
त्यांना ग्रज्युएट अवाॅर्ड इन बुद्धिस्ट स्टडिज, अमेरिकेतील संस्थेकडून लाईफ टाईम स्कॉलर, प्राकृत भाषेच्या सेवेसाठी प्राकृत ज्ञान भारती पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते.
photo-
१.डॉ पद्मनाभजी जैनी १९९७ ला भारत भेटीवर आले असता बाहुबली येथे गुरुकुल संस्थापक गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतेले होते.
२. डॉ पद्मनाभजी जैनी
bharat shastri 9422741695