प्रकाश आवाडेंची केंद्रावर स्तुतिसुमने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:10+5:302020-12-12T04:39:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, ...

Praise be to the center of light | प्रकाश आवाडेंची केंद्रावर स्तुतिसुमने

प्रकाश आवाडेंची केंद्रावर स्तुतिसुमने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, अशी टीका करीत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे उद्योगधंद्यांना उभारी मिळाली, अशा शब्दांत आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर सभेत भाजपबद्दल प्रेम व्यक्त केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये आमदार आवाडे यांची भाजपच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबद्दल जोरदार चर्चा रंगली.

एका बॅँकेच्या वार्षिक सभेत बोलताना आवाडे यांचे भाजपप्रेम प्रकर्षाने जाणवले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांना सोसावा लागला. यामधून सावरण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, आदी घटकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती; पण शासनाने मदत केली नाही, असा आरोप करीत राज्य शासनाच्या संकटकाळातील धोरणावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.

याउलट केंद्र शासन म्हणजे भाजप सरकारवर स्तुतिसुमने उधळत केंद्राच्या मदतीमुळे उद्योग-व्यवसायांना उभारी घेण्यासाठी मदत मिळाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला आता गती येत असून, आगामी काळात सर्व घटकांना निश्चितपणे ऊर्जितावस्था मिळेल, असा विश्वासही आवाडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आवाडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला शुक्रवारी पुन्हा उभारी मिळाली. भाजप प्रवेशाबाबत आवाडे यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले असले तरी चर्चेला मात्र जोर चढला आहे.

Web Title: Praise be to the center of light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.