हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्राजक्ता उपाध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:15+5:302021-01-22T04:23:15+5:30
हातकणंगले : हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्राजक्ता प्रवीण उपाध्ये यांची तर शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून रणजित पाटील यांची ...
हातकणंगले : हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्राजक्ता प्रवीण उपाध्ये यांची तर शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून रणजित पाटील यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अरुण जानवेकर होते.
हातकणंगले नगरपंचायतीमध्ये शिवसेना सात, भाजपा पाच, कॉंग्रेस एक, राष्ट्रवादी एक तर तीन अपक्ष असे बलाबल आहे. येथे महाविकास आघाडीची सत्ता आहे. पाहिल्यांदा शिवसेनेचे रणजित धनगर यांची उपनगराध्यक्षपदी तरी धोंडीराम कोरवी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. गटांतर्गत ठरल्यानुसार दोघांनी ही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागांसाठी आज निवड करण्यात आली. उपनगराध्यपदासाठी प्राजक्ता उपाध्ये यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यासाठी सूचक म्हणून फरिदा मुजावर यांची तर अनुमोदक म्हणून रोहिणी खोत यांच्या सह्या होत्या. एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड केल्याचे जाहीर करण्यांत आली. तर स्वीकृत नगरसेवकपदी रणजित नानासो पाटील याची निवड झाली. यावेळी मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - अयडेंटी १ ) प्राजक्ता उपाध्ये (उपनगराध्यक्ष)
२) रणजित पाटील (स्वीकृत नगरसेवक)
उद्यासाठी निवडीची जाहिरात आहे. बातमी घ्यावी.