प्रकाश आबिटकरांची चंद्रकांतदादांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:01 AM2017-09-11T01:01:20+5:302017-09-11T01:01:20+5:30

Prakash Abeitkar's discussions with Chandrakant Das | प्रकाश आबिटकरांची चंद्रकांतदादांसोबत चर्चा

प्रकाश आबिटकरांची चंद्रकांतदादांसोबत चर्चा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आघाड्यांच्या चर्चा सुरू असतानाच रविवारी विरोधी आघाडीचे नेते आमदार प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली.
या भेटीमुळे ‘बिद्री’च्या राजकारणात खळबळ उडाली असून, भेटीतील तपशील समजू शकला नसला तरी राष्टÑवादीवर दबावाचे राजकारण या भेटीमागे असल्याचे बोलले जाते.
‘बिद्री’ कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजपच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपला पाच जागा देण्याबाबतही एकमत झाल्याची चर्चा सुरू असताना रविवारी सायंकाळी विरोधी गटाचे नेते आमदार प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. चर्चेतील तपशील अधिकृत समजला नसला तरी भाजपने शिवसेनेसोबत राहावे, असा आग्रह आमदार आबिटकर यांनी मंत्री पाटील यांच्याकडे धरल्याचे समजते. भाजपला आठ जागा देण्याचा प्रस्तावही दिल्याचे समजते; पण राष्टÑवादीसोबतची आघाडी निश्चित झाल्याने मंत्री पाटील यांनी या प्रस्तावास होकार दिला नसल्याचेही कळते.
राष्टÑवादी-भाजपची घोषणा लांबणीवर
बिद्री कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजपच्या आघाडीची घोषणा रविवारी आमदार सुरेश हाळवणकर हे अधिकृतपणे करणार होते; पण आमदार आबिटकर यांच्या भेटीमुळे ही घोषणा लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत फोडाफोडी राहणार
‘बिद्री’ कारखान्याच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते. ऐनवेळी आघाड्यांत बिघाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे याही निवडणुकीत दोन्ही गटांकडून सावध हालचाली सुरू ठेवल्या आहेत.

Web Title: Prakash Abeitkar's discussions with Chandrakant Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.