प्रकाश शहापूरकर यांचे घर फोडले, कौलगेत ५२ हजाराची भांडी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 03:53 PM2020-05-30T15:53:55+5:302020-05-30T15:55:04+5:30
कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. प्रकाश शहापूरकर यांचे घर फोडून अज्ञात चोरट्याने ५२ हजार रूपंयाची तांब्याची व पितळेची भांडी लंपास केली आहेत.
Next
ठळक मुद्देप्रकाश शहापूरकर यांचे घर फोडलेकौलगेत ५२ हजाराची भांडी लंपास
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. प्रकाश शहापूरकर यांचे घर फोडून अज्ञात चोरट्याने ५२ हजार रूपंयाची तांब्याची व पितळेची भांडी लंपास केली आहेत.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, शहापूरकर यांच्या घरातील जेवण खोलीला लागून असलेल्या खोलीतील माळ्यावर तांब्याचे पाच हंडे, दोन घागरी, एक कुकर, एक मोठे पातेले, दहा पितळी डब्बे व पातेली, दोन पराती ठेवल्या होत्या.
२० मार्च ते १६ एप्रिल २०२० या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूची कौले काढून वरील वर्णनाची ५२ हजार रूपयांची भांडी लंपास केली आहेत. गणपतराव डोंगरे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.