अंबाबाई मूर्तीत प्राणप्रतिष्ठापना

By admin | Published: August 4, 2015 11:59 PM2015-08-04T23:59:05+5:302015-08-04T23:59:05+5:30

विधी आजपासून : मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण

Pramaprana in Ambabai Murti | अंबाबाई मूर्तीत प्राणप्रतिष्ठापना

अंबाबाई मूर्तीत प्राणप्रतिष्ठापना

Next

कोल्हापूर : श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीतील प्राणतत्त्व पुनर्प्रतिष्ठापना विधी आज, बुधवारपासून सुरू होणार आहेत. गुरुवारी दुपारनंतर हे सगळे विधी पूर्ण होऊन देवीची मूर्ती दर्शनासाठी खुली होईल. दरम्यान, मंगळवारी करवीर नगरीतील दैवतांना अभिषेक करण्यात आला. संवर्धनाच्या उद्देशाने अंबाबाई मूर्तीचे दर्शन २३ जुलैपासून बंद ठेवण्यात आले होते. २५ जुलै ते २ आॅगस्टपर्यंत पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनाचे काम केले. या कार्यासाठी मूर्तीमधील प्राणतत्त्व कलशात काढून घेण्यात आले होते. आता मूर्ती संवर्धनाचे काम संपल्याने आज, बुधवारपासून मूर्तीत प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात होणार आहेत. उद्या, गुरुवारी दुपारी देवीच्या मूर्तीचे भाविकांना नव्या रूपात दर्शन घडेल.दरम्यान, मंगळवारी कोल्हापुरातील श्री रंकभैरव, श्री त्र्यंबोली, ग्रामदैवत श्री कपिलेश्वर, श्री काशीविश्वेश्वर, श्री मातुर्लिंग, श्री उज्ज्वलाम्बा, श्री कात्यायनी, श्री सिद्ध बटुकेश्वर, श्री केदारनाथ, श्री कालभैरव, श्री वेताळभैरव, श्री एकवीरा, श्री मुकाम्बिका, श्री फिरंगाई, श्री कमलजा, श्री महाकाली, श्री अनुगामिनी, श्री गजलक्ष्मी, श्री लक्ष्मी, श्री नृसिंह या क्षेत्रस्थ दैवतांना अभिषेक करण्यात आला. तसेच सर्व देवतांना साडी, महावस्त्रे अर्पण करण्यात आली. त्यानंतर रात्री शास्त्रीय गायन झाले. (प्रतिनिधी)


उद्या दुपारी तीननंतर दर्शन
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीस करावयाची रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मूळ मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करावयाचा विधी उद्या, गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर मूर्तीचे दर्शन सुरूकरण्यात येणार असल्याचे सचिव, देवस्थान व्यवस्थापन समिती यांनी कळविले आहे.

Web Title: Pramaprana in Ambabai Murti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.