पुण्याच्या मतिमंद मुलाचे वाचवले प्राण, कोल्हापुरकरांची माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:40 PM2018-09-24T16:40:40+5:302018-09-24T16:43:52+5:30

शनिवारी दुपारी बाराची वेळ. पुण्यातील एका मनोरुग्ण तरुणाने अचानक रंकाळ््यात उडी घेतली, हे पाहताच तेथील तरुणांनी तातडीने त्याला वाचवले, शाहीर आझाद नायकवडी व जुना राजवाडा पोलिसांनी त्याला सांभाळले आणि पालकांच्या स्वाधीन केले.

Pran, Kolhapurkar's humanity saved the mentally challenged child of Pune | पुण्याच्या मतिमंद मुलाचे वाचवले प्राण, कोल्हापुरकरांची माणुसकी

जुना राजवाडा पोलीस व शाहीर आझाद नायकवडी यांनी शनिवारी पुण्यातील योगेश चांदणे ला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले.

Next
ठळक मुद्देपुण्याच्या मतिमंद मुलाचे वाचवले प्राण -कोल्हापुरकरांची माणुसकीतुमच्यामुळे आमचा मुलगा जिवंत आहे, पालकांची कृतज्ञता

कोल्हापूर : शनिवारी दुपारी बाराची वेळ. पुण्यातील एका मनोरुग्ण तरुणाने अचानक रंकाळ््यात उडी घेतली, हे पाहताच तेथील तरुणांनी तातडीने त्याला वाचवले, शाहीर आझाद नायकवडी व जुना राजवाडा पोलिसांनी त्याला सांभाळले आणि पालकांच्या स्वाधीन केले. कोल्हापुरकरांमुळे आमचा मुलगा जिवंत आहे, अशी भावना व्यक्त करत त्या माता पित्याने आभार व्यक्त केले.

पुणे येथील योगेश चांदणे हा थोडा मानसिक रुग्ण असणारा विवाहित तरुण शुक्रवारी पहाटे कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडला आणि कोल्हापूरात आला. शनिवारी फिरत फिरत तो रंकाळ््यावर आला. येथे तो विचित्र वागत असल्याचे काही जणांना जाणवले, आणि अचानक त्याने पाण्यात उडी घेतली. हे पाहताच तिथल्या तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले.

भेदरलेला आणि भिजलेला योगेश थरथरत असल्याचे पाहून मनीषा नायकवडी यांनी पती शाहीर आझाद नायकवडी यांना फोन करून याची कल्पना दिली. आझाद घटनास्थळी दाखल झाले आणि योगेशशी संवाद साधून त्याचे वडील व पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय आदिनाथ चांदणे यांना फोन करून घडल्या प्रकाराची कल्पना दिली. हे कळताच पुण्यात त्याला शोधत असलेले आई वडिल कोल्हापूरला निघाले.

दरम्.यान आझाद नायकवडी यांनी योेगेशला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेले. येथे पोलिसांनी त्याला चहा-नाष्टा आणि जेवण दिले. सायंकाळी सात वाजता त्याचे आई-वडिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

कोल्हापूरकरांची माणुसकी पाहुन भारावलेल्या चांदणे कुटूंबियांनी शाहीर आझाद नायकवडी, मनीषा नायकवडी, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राजू चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल केशव राठोड यांचे आभार मानले. आणि मुलाला घेवून ते पुण्याला गेले.

 

 

Web Title: Pran, Kolhapurkar's humanity saved the mentally challenged child of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.