Corona virus collector kolhapur : संभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:34 PM2021-05-17T19:34:41+5:302021-05-17T19:37:05+5:30

Corona virus collector kolhapur : पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाबाबतचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २५ ते ३० जुलै आणि दि. ८ ते १२ ऑगस्टदरम्यान पूर येतो. २०१९ ला आलेल्या पुराचा अनुभव पाहता, मागी वर्षी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पध्दतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.

Pre-control of dam water to prevent possible floods: Daulat Desai | Corona virus collector kolhapur : संभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण : दौलत देसाई

कोल्हापुरात सोमवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक ऑनलाईन झाली. त्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी शेजारी शैलेश बलकवडे, बजरंग पाटील, कादंबरी बलकवडे, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसंभाव्य पूर टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण : दौलत देसाई गेल्यावर्षीप्रमाणे सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजन : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाबाबतचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २५ ते ३० जुलै आणि दि. ८ ते १२ ऑगस्टदरम्यान पूर येतो. २०१९ ला आलेल्या पुराचा अनुभव पाहता, मागी वर्षी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पध्दतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक ऑनलाईन झाली. त्यात खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव सहभागी झाले. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षात प्रत्येक विभागाचा एक प्रतिनीधी कार्यरत असतो. सातारा, सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कात याही जिल्ह्याचा विभाग असून, येणाऱ्या आपत्तीपासून सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला नियंत्रित ठेवू, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत मासाळ यांनी पूर्वतयारीची माहिती दिली. आर. के. पोवार, सर्जेराव पाटील, शिवाजी मोरे, सत्यजित जाधव, अशोक रोकडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, ए. बी. पाटील यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

Web Title: Pre-control of dam water to prevent possible floods: Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.