कोल्हापुरात अवकाळी पाऊस, ‘अरबी’ समुद्रात कमी दाबाचा पट्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:52 PM2019-12-03T15:52:03+5:302019-12-03T15:55:22+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाला. ‘अरबी’ समुद्र व हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल झाला असून या पावसाने भाजीपाल्यासह वीटभट्टीचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शनिवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाला. ‘अरबी’ समुद्र व हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल झाला असून या पावसाने भाजीपाल्यासह वीटभट्टीचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शनिवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
यंदा सर्वच ऋतू पुढे सरकलेच्या दिसते. परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहिला. पाऊस थांबून आता कुठे थंडीची चाहूल लागली होती. तोपर्यंत सोमवारपासून वातावरणात बदल झाला. सकाळी ढगाळ वातावरणासह आकाश भरून आले होते. सकाळी नऊच्या दरम्यान सुर्यनारायणाचे नुसते दर्शन दिले आणि पुन्हा गायब झाला. दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती. साधारणत: दुपारी साडेतीनच्या दरम्यान कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि विषवृत्ताच्या हिंदी महासागराजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुढील चार-पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. सोमवारी किमान तापमान २१ तर कमाल २७ डिग्रीपर्यंत राहिले. अचानक ढगाळ वातावरण झाल्याने वीट व्यवसायकांची चांगलीच तारांबळ उडाली. विटा झाकण्यासाठी सोमवारी पहाटेपासून मजुरांची धांदल सुरू होती. या वातावरणाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसणार आहे.
पाऊस पाठ सोडेना!
यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गेली पंधरा-वीस दिवस पावसाने उसंत घेतली तोपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला.
आठ दिवसांतील तापमान डिग्रीमध्ये असे-
वार किमान कमाल वातावरण
मंगळवार २१ २७ ढगाळ, तुरळक पाऊस
बुधवार २१ २९ ढगाळ
गुरुवार १९ ३१ ढगाळ
शुक्रवार १८ ३१ ढगाळ
शनिवार १८ ३१ ढगाळ
रविवार १९ ३१ स्वच्छ