वेळ मॉर्निग वॉकची अन् आयुक्तांची पूर्वपूरपरिस्थितीची पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:54 AM2019-06-24T11:54:05+5:302019-06-24T11:56:24+5:30

मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की शहरातील सखल भागांत पाणी येते. शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा या ठिकाणी जयंती नाल्यातून पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते. पूरपरिस्थितीपूर्वी काय उपाययोजना करता येतील, काही समस्या आहेत काय, याची पाहणी करण्यासाठी रविवारी पहाटे सहाच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी रस्त्यावर उतरले.

Preliminary survey of time mornings and commissioner | वेळ मॉर्निग वॉकची अन् आयुक्तांची पूर्वपूरपरिस्थितीची पहाणी

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथील जयंती नाल्याच्या पुलाची रविवारी पहाटे पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व अधिकारी.

Next
ठळक मुद्देवेळ मॉर्निग वॉकची अन् आयुक्तांची पूर्वपूरपरिस्थितीची पहाणीमहानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना; पुलांचे कठडे, पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दुरुस्ती करा

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की शहरातील सखल भागांत पाणी येते. शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा या ठिकाणी जयंती नाल्यातून पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते. पूरपरिस्थितीपूर्वी काय उपाययोजना करता येतील, काही समस्या आहेत काय, याची पाहणी करण्यासाठी रविवारी पहाटे सहाच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी रस्त्यावर उतरले.

मॉर्निंग वॉकच्या वेळेत त्यांनी जवाहरनगर रेणुका मंदिरपासून संभाजी पूल ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत जयंती नाल्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत दोन अधिकारी होते. नजरेसमोर आलेल्या समस्यांची तत्काळ अंमलबजावणी करून दुरुस्तीचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

एकेकाळी धार्मिक अधिष्ठान लाभलेली जयंती नदी आणि सध्यस्थितीत फक्त लोकप्रतिनिधींच्या उदासीनता, दुर्लक्ष, अतिक्रमणामुळे नदीचे स्वरूप मोठ्या नाल्यात झाले. पावसाळ्यापूर्वी यंदा महानगरपालिकेमार्फत लोकसहभागातून नालेसफाई म्हणजेच नाल्याला नदीचे पूर्ववत स्वरूप प्राप्त करून देण्याची संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हाती घेतली.

रामानंदनगर, हॉकी स्टेडिअम, सावित्रीबाई फुले रुग्णालय, लक्ष्मीपुरी, आयर्विन ब्रिज ते खानविलकर पेट्रोलपंपानजीक पंप हाऊसपर्यंत या जयंती नाल्याच्या दोन्ही काठांवरील कचरा, प्लास्टिक, पाण्यातील गाळ काढून हे पाणी प्रवाहित ठेवले.

मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की शहरातील जयंती नाला परिसरातील सखल भागांत पाणी येते. शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा या ठिकाणी पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते. परिस्थिती उद्भवण्यापूर्वी त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी पहाटे आयुक्त डॉ. कलशेट्टी रस्त्यावर उतरले.

मॉर्निंग वॉकच्या वेळेत त्यांनी जवाहरनगर रेणुका मंदिरपासून ते खानविलकर पेट्रोलपंपापर्यंत जयंती नाल्याची पाहणी केली. पहाटे रस्त्यावर उतरलेल्या आयुक्तांना पाहून अनेक अतिक्रमणधारकांनी धास्ती घेतली.

सेल्फी पॉर्इंट

लक्ष्मीपुरीतील विल्सन पुल, कोंडाओळ येथील पुलाची पाहणी डॉ. कलशेट्टी यांनी केली. कोंडाओळ येथील पुलावर जयंती नाल्याला पूर आला की पाण्याची पातळी मोठी दिसते. या ठिकाणी पूरपरिस्थिती पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते; त्यामुळे या पुलावर सेल्फी पॉर्इंट करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे.
 

 

Web Title: Preliminary survey of time mornings and commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.