मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात लोकसभा निवडणूक : १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी

By admin | Published: May 15, 2014 01:00 AM2014-05-15T01:00:19+5:302014-05-15T01:04:28+5:30

कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१४च्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Preparation for counting of votes: Lok Sabha elections in the last phase: Counting of votes from 8 am on May 16 | मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात लोकसभा निवडणूक : १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी

मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात लोकसभा निवडणूक : १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी

Next

कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१४च्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शासकीय कृषी महाविद्यालयासमोर बांधलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. तेथेच १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदासंघासाठीची मतमोजणी स्वतंत्र हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे १५०० कमर्चारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असतील. त्यावरून जास्तीत जास्त २६ फेर्‍यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टेबलसाठी उमेदवारांना एक प्रतिनिधी नेमण्याची परवानगी आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी जवळपास १२२९ प्रतिनिधी नेमले आहेत. पोस्टल मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगलेसाठी प्रत्येकी ७ टेबल आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रिया गतीने होण्यासाठी मतमोजणी कक्षामध्ये ७८ संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर व सुरक्षा कक्ष यांच्यावर सतत नजर ठेवण्यासाठी ६४ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्रत्येक फेरीनिहाय निकाल ऐकण्यासाठी सायबर चौक, त्रिशक्ती चौक, शिवाजी विद्यापीठ चौक, आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकारी आणि कमचार्‍यांबरोबरच उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या बसण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र वार्ताहर कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. इमारतीच्या बाहेर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो बंदोबस्त राहणार असून बाहेर मंडपही उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी माने व उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी भेट देऊन मतमोजणी केंद्राची पाहणी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्टÑीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या जनरल लोकसभा इलेक्शन २०१४ या सॉफ्टवेअरच्या आधारे प्रत्येक फेरीच्या मतमोजणीची नोंद केली जाणार आहे. हा निकाल एकत्रीकरण करणे व वेबसाईटवर टाकण्यासाठी ७६ जणांचा गट केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Preparation for counting of votes: Lok Sabha elections in the last phase: Counting of votes from 8 am on May 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.