लहान मुलांसाठी स्वतंत्र वाॅर्डच्या व्यवस्थेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:48+5:302021-08-23T04:26:48+5:30
कोल्हापूर : कोरोना आजाराची तिसरी लाट आली तर लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरही वैद्यकीय ...
कोल्हापूर : कोरोना आजाराची तिसरी लाट आली तर लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरही वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत असले तरी महापालिका प्रशासनाने बाधित झाल्यास लहान मुलांसाठी स्वतंत्र वाॅर्डची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि राजोपाध्येनगरातील जागा निश्चित करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या लाटेत लहान मुलांना कमी बाधा झाली. पण आरोग्य तज्ज्ञ तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करीत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त बाधित होतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण लहान मुलांमध्ये प्रतिकार शक्ती चांगली असल्याने ती मोठ्या संख्येने कोरोनाने बाधित होणार नाहीत, अशीही चर्चा आरोग्य यंत्रणेत अलिकडे होत आहे. अशाप्रकारे यापुढील काळात लहान मुले मोठ्या संख्येने बाधीत होतील, यावर तज्ज्ञांमध्येही एकसूर दिसून येत नाही. तरीही महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी जे जे करणे आवश्यक आहे, ते करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात महापालिका, जिल्हा आरोग्य विभागाकडील डॉक्टरांना तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.