शरद पवार यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:54+5:302021-01-10T04:17:54+5:30
पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेसमोरील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २२ जानेवारीला सकाळी ...
पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेसमोरील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २२ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. मुश्रीफ यांनी सुरुवातीला शासकीय विश्रामगृहावर अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
यानंतर सर्वजण पोलीस मैदानावर गेले. तेथे मंडप आणि अनुषंगिक सुचना मुश्रीफ यांनी केल्या. पवार हे सुरुवातीला जिल्हा परिषदेसमोरील चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर चौथ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यानंतर ते पोलीस मैदानावर येतील. येथे ३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येईल, त्यानंतर जाहीर कार्यक्रम सुरू होणार आहे.
बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, व्यासपीठाची क्षमता, प्रमुख पाहुणे या सर्व बाबतीत यावेळी मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनाही त्यांनी काही सूचना केल्या. यावेळी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला आणि बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव, प्रियदर्शिनी मोरे, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे आदी उपस्थित होते.
चौकट
तुमचा शेवटचा कार्यक्रम
मैदानावरची पाहणी केल्यानंतर मुश्रीफ गाडीत बसताना म्हणाले, आता रोज एका एका सभापतींनी ही कार्यक्रमाची तयारी योग्य सुरू आहे का याची पाहणी करा. तुमचा शेवटचा कार्यक्रम जोरात झाला पाहिजे. मुश्रीफांच्या तोंडातून हे शब्द आल्यानंतर मात्र खरोखरच या कार्यक्रमानंतर पदाधिकारी बदलाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.
०९०१२०२१ कोल झेडपी ०१
शरद पवार यांच्या कार्यक्रमस्थळाची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, पद्माराणी पाटील, राजेश पाटील, अमन मित्तल, अरुण जाधव, मनीषा देसाई, व्ही. आर. कांडगावे, प्रियदर्शिनी मोरे, आदी उपस्थित होते.