खुल्या स्पर्धेत टिकण्याची तयारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:21+5:302020-12-07T04:18:21+5:30

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्याच्या सेवेसाठीच्या परीक्षेतील यशात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे अपयशातून येणारे नैराश्यावर मात करा आणि खुल्या ...

Prepare to survive the open competition | खुल्या स्पर्धेत टिकण्याची तयारी करा

खुल्या स्पर्धेत टिकण्याची तयारी करा

googlenewsNext

गडहिंग्लज :

केंद्र आणि राज्याच्या सेवेसाठीच्या परीक्षेतील यशात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे अपयशातून येणारे नैराश्यावर मात करा आणि खुल्या स्पर्धेत टिकण्याची तयारी मनापासून करा, यश नक्कीच मिळेल, असा विश्वास केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विभागाचे सहसंचालक शिवाजी पाटील यांनी दिला.

येथील झेप अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.

पाटील म्हणाले, युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी एकाचवेळी करा. मिळालेल्या संधीवर स्वार व्हा. बी प्लॅन डोळ्यासमोर ठेवून तयारी करा. त्यातून नक्कीच ध्येय गाठता येईल. प्रारंभी प्रा. किरण पोतदार यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार झाला.

कार्यक्रमास प्रा. वासुदेव मायदेव, महेश मजती, प्राचार्य रामचंद्र निळपणकर, प्रदीप अभ्यंकर, विजय आरबोळे, बसाप्पा आरबोळे, रेखा पोतदार, सुहासिनी पाटील, जिनेंद्र बिद्रे, सीमा साठे, श्वेता टोण्णणावर उपस्थित होते. मीना रिंगणे यांनी स्वागत केले. शिवानी कोरगांवकर यांनी सूत्रसंचालन केले. नितेश रायकर यांनी आभार मानले.

---------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात शिवाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किरण पोतदार, एम. एल. चौगुले, मीना रिंगणे, वासुदेव मायदेव उपस्थित होते.

क्रमांक : ०६१२२०२०-गड-०४

Web Title: Prepare to survive the open competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.