हनुमान प्रभात शाखेवर सरसंघचालकांची उपस्थिती, मोहन भागवत यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
By समीर देशपांडे | Published: December 18, 2023 10:04 AM2023-12-18T10:04:43+5:302023-12-18T10:05:36+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेवून अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र हायस्कूलवरील हनुमान प्रभात शाखेवर उपस्थिती लावली.
समीर देशपांडे
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेवून अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र हायस्कूलवरील हनुमान प्रभात शाखेवर उपस्थिती लावली.
भागवत हे रविवारी रात्री उशिरा सांगलीचा कार्यक्रम आवरून कोल्हापुरात आले. स्वयंसेवकाच्या घरी मुक्काम केल्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजता ते अंबाबाई मंदिरात आले. तेथे श्रीपूजकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ४० मिनिटे ते मंदिरात होते. अभिषेक करून ते थेट हनुमान प्रभात शाखेवर गेले. तेथे सांघिक पद, बोधकथा, सुभाषिते, अमृतवाचन आणि प्रार्थनेत ते सहभागी झाले. यानंतर ते कोकणाकडे रवाना झाले. यावेळी प्रताप दड्डीकर, डॉ. सुर्यकिरण वाघ, प्रमोद ढोले यांच्यासह संघ पदाधिकारी उपस्थित होते.