पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची हजेरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:29 PM2021-06-13T18:29:46+5:302021-06-13T18:31:27+5:30

Rain Kolhapur : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस बरसण्याच्या हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टचा दुसरा दिवसही जिल्ह्यात तसा कोरडाच गेला. पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची रिपरिप कायम असुन उर्वरीत जिल्ह्यात मात्र कुठे जोरदार तर कुठे भूरभूर असा पावसाचा व ढगांचाही लपंडाव अनुभवणारे वातावरण राहिले. कोल्हापूर शहरात तर दिवसभर कडकडीत ऊन पडल्यानंतर संध्याकाळी पाचनंतर पावसाची भूरभूर सुरु झाली, पण त्यात जोर नव्हता.

Presence of rainfall in Gaganbawda along the catchment area | पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची हजेरी कायम

पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची हजेरी कायम

Next
ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची हजेरी कायम इतरत्र मात्र जोरदार पावसाची हुलकावणी

कोल्हापूर: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस बरसण्याच्या हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टचा दुसरा दिवसही जिल्ह्यात तसा कोरडाच गेला. पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात पावसाची रिपरिप कायम असुन उर्वरीत जिल्ह्यात मात्र कुठे जोरदार तर कुठे भूरभूर असा पावसाचा व ढगांचाही लपंडाव अनुभवणारे वातावरण राहिले. कोल्हापूर शहरात तर दिवसभर कडकडीत ऊन पडल्यानंतर संध्याकाळी पाचनंतर पावसाची भूरभूर सुरु झाली, पण त्यात जोर नव्हता.

शनिवारपासून पाच दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार ऑरेज अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते, पण या अंदाजाच्या पहिल्याच दिवशी पावसाऐवजी चक्क कडकडीत ऊन अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली. शनिवारी रात्री हलकासा पाऊस पडला पण रविवारी सकाळी पुन्हा एकदा आभाळ निरभ्र झाले. दिवसभर ढगांचा लपंडाव सुरु होता. ढग भरुन येत होते, पण बरसत नव्हते.

अवघा चार मि.मि पाऊस

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठपर्यंत सरासरी अवघा ४ मि.मि पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ३६ मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात झाला आहे. चंदगड ८, शाहूवाडी ७, आजरा व करवीर४, भूदरगड व राधानगरी २, आणि अन्य ठिकाणी अर्धा ते एक मिलिमीटर पाऊस झाला आहे.

 

Web Title: Presence of rainfall in Gaganbawda along the catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.