इचलकरंजीत मुसळधार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:17+5:302021-06-04T04:20:17+5:30
इचलकरंजी : शहर व परिसरात माॅन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उन्हापासून हैराण झालेल्या शहरवासीयांना वातावरणात ...
इचलकरंजी : शहर व परिसरात माॅन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उन्हापासून हैराण झालेल्या शहरवासीयांना वातावरणात थोडा गारवा जाणवला. मंगळवारी (दि.२) काही प्रमाणात पाऊस पडला होता.
शहरात सकाळी कडक ऊन पडले होते. अंगाची लाहीलाही करणाºया उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल होत पावसाचे ढग दाटून आले. तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या कडकडाटासह अनेक तास पाऊस शहरात बरसत होता. यामुळे महावितरणने काही भागातील वीज पुरवठा खंडित केला.
सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक गटारी भरून रस्त्यावर पाणी साचले होते. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. पावसामुळे शहरातील रस्ते ओस पडले. दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र माॅन्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार शहरात माॅन्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसत होते.