इचलकरंजीत नृत्याविष्कार कार्यक्रमाचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:07+5:302021-08-12T04:28:07+5:30

सुरुवातीला निवृत्त मुख्याध्यापिका नीलिमा दिवटे व मान्यवरांनी नटराज प्रतिमेचे पूजन केले. दिवटे यांनी, विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासाबरोबरच एखादी कला किंवा ...

Presentation of Ichalkaranji Dance Discovery Program | इचलकरंजीत नृत्याविष्कार कार्यक्रमाचे सादरीकरण

इचलकरंजीत नृत्याविष्कार कार्यक्रमाचे सादरीकरण

Next

सुरुवातीला निवृत्त मुख्याध्यापिका नीलिमा दिवटे व मान्यवरांनी नटराज प्रतिमेचे पूजन केले. दिवटे यांनी, विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासाबरोबरच एखादी कला किंवा खेळ या छंदाची जोपासना करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कलाशिक्षण आणि सादरीकरणामुळे विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्त्व अधिक विकसित होण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.

नृत्य सादरीकरणाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी हे गजवदना ही गणेश स्तुती सादर केली. त्यानंतर लहान मुलींपासून युवती आणि महिलांपर्यंत विविध वयोगटातील विद्यार्थिनींनी कार्यक्रमात त्रिताल, एकताल, गजझंपा, झपताल आदी ताल सादर केले. यामध्ये त्यांनी थाट, आमद, परण, तोडे, चक्री, कवित आदी प्रकार सादर करून आपले नृत्य कौशल्य दाखविले. कार्यक्रमाच्या शेवटी जग मे सुंदर है दो नाम या भजनावर नृत्यरचना सादर करण्यात आली. सर्व नृत्यांसाठी दिग्दर्शन सायली होगाडे व ज्योती सांगले यांनी केले. संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी यतीराज भंडारी, मीनाक्षी तंगडी, यास्मिन कांबळे, रुपाली तारदाळे, मनाली मुनोत, शोभा मगदूम, आदी उपस्थित होते. राजू तारदाळे यांनी आभार मानले.

फोटो ओळी

१००८२०२१-आयसीएच-०१

पदन्यासच्या विविध वयोगटातील विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन मनोहारी नृत्यरचना सादर केल्या.

Web Title: Presentation of Ichalkaranji Dance Discovery Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.